राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी पुत्राने अजित पवारांसमोर 6 प्रश्न उपस्थित केलेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकात बॅनरच्या माध्यमातून हे 6 प्रश्न विचारले आहेत. सध्या हे बॅनर चर्चेचा विषय बनले आहे.
बारामतीप्रमाणे बीड जिल्हा जलसमृद्ध कधी होणार?
धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 चा पिक विमा मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना कधी ?
गेल्या वर्षीचे अनुदान वाटप कधी?
जिल्ह्यांच्या शैक्षणिक विकासासाठी एखादे विद्यापीठ कधी ?
कामगारांना प्रमाणपत्र आणि पाल्यांना शिष्यवृत्ती कधी ?
बारामतीचे रस्ते चकाचक झाले बीडचे खड्डे भरणार कधी ?
बीड जिल्ह्यातील विकासकामे, दुष्काळी परिस्थिती, विविध प्रस्तावित जलप्रकल्प, वीजपुरवठा व महावितरण कडील अन्य समस्यांचे निराकरण आदी विषयी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडेंसह लोकप्रतिनिधींशी चर्चा केली. (Latest Marathi News)
बीड जिल्ह्यात येत्या रविवारी होत असलेल्या जाहीर सभेमध्ये कोणत्याही घटकांवर टीका न करता बीड जिल्ह्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी याआधीही सांगितले होते. त्याला अनुसरून मंत्रालयात बीड जिल्ह्यातील विकास कामांच्या संदर्भात विविध बैठकांचे सत्र सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.