Subodh Mohite Join Ajit Pawar Group Saam TV
महाराष्ट्र

Subodh Mohite Join Ajit Pawar Group: सुबोध मोहिते यांनी सोडली शरद पवारांची साथ, अजित पवार गटात झाले सामील

सुबोध मोहिते यांनी सोडली शरद पवारांची साथ, अजित पवार गटात झाले सामील

साम टिव्ही ब्युरो

>> चेतन व्यास

Subodh Mohite Join Ajit Pawar Group: राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी शरद पवारांची साथ सोडली असून ते आता अजित पवार गटात सामील झाले आहेत. त्यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. अजित यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत विदर्भातील विकासाच्या राजकारणात योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत मोहिते यांनी विदर्भाच्या विकासासाठीही अजित पवार यांना साथ देणार असल्याचं सांगितलं.

कोण आहेत सुबोध मोहिते?

सुबोध मोहिते यांनी मे २०२१ मध्ये त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमान शेतकरी संघ, शिवसंग्राम अशा राजकीय पक्षामधून त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत झाला आहे. (Latest Marathi News)

ज्येष्ठ नेत्यांशी जवळीक साधूनही ते राजकारणात स्वत:ला प्रस्थापित करू शकलेले नाहीत. मोहिते हे राजकारणातील महत्त्वाकांक्षी लोकप्रतिनिधी मानले जातात. ते सिव्हिल इंजिनिअर आहे. त्यांनी सरकारी निकारीही केली आहे. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात ते तत्कालीन मंत्री महादेव शिवणकर यांचे खासगी सचिव होते.

वर्ष १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्याच वर्षी मोहिते यांनी रामटेक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांच्या विजयात राष्ट्रवादीचे उमेदवार पांडुरंग हजारे यांना मिळालेली मते महत्त्वपूर्ण ठरली.

बनवारीलाल पुरोहित यांचा पराभव झाला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री असलेले मोहिते यांनी नंतर शिवसेनेविरुद्ध बंड केले. नारायण राणेंसोबत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahrukh Khan: शाहरुख खानसाठी मुलगा आर्यन झाला फोटोग्राफर; 'बॅड्स ऑफ बॉलीवूड'च्या स्क्रीनिंगचा VIDEO व्हायरल

High Court: मराठा आरक्षणाच्या GR विरोधात याचिका, न्यायाधीशांनी दिला मोठा निर्णय, कोर्टात नेमकं काय काय झालं?

Maharashtra Live News Update: एमएससीबीच्या वायरमेनच काम करणे शेतकऱ्याच्या जीवावर बेतले

म्हाडाकडून बंपर लॉटरी; पिंपरी चिंचवडमध्ये प्राईम लोकेशनवर फक्त ₹२० लाखांत घर, आजच अर्ज करा

Homemade Hair Mask : ब्युटी पार्लरमध्ये जायला वेळ नाही? घरीच बनवा 'हा' हेअर मास्क, केस होतील चमकदार

SCROLL FOR NEXT