Palghar Zilla Parishad saam Tv
महाराष्ट्र

Palghar News:मास्तर गैरहजर; पाढा वाचण्याऐवजी विद्यार्थ्यांनी चालवला 'एका दुरी तिरी'चा खेळ

Palghar Zilla Parishad: पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय.

Bharat Jadhav

Palghar Zilla Parishad School:

पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. शाळेत शिकवण्यासाठी मास्तर नसल्यानं शाळेतील विद्यार्थ्यांनी जुगाराचा खेळ चालवला. हा सर्व प्रकार तलासरी तालुक्यातील सुत्रकार डोंगर पाडा येथील शाळेतील आहे. शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी पत्ते दिसत आहेत. विद्यार्थी पत्ते खेळत असल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर तलासरी पंचायत समितीच्या अधिकारांना जाग आली. (Latest News)

दरम्यान हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. ग्रामीण भागात शिक्षणाची स्थिती काय आहे हे या प्रकारातून समोर येत आहे. एका बाजूला डिजिटल इंडिया सारख्या वल्गना केल्या जात आहेत, तर दुसऱ्या बाजूला मात्र पालघर सारख्या ग्रामीण भागातील शाळेत शिक्षक नसल्याचं वास्तव समोर येत आहे. सुत्रकार डोंगर पाडा येथे पहिली ते चौथीपर्यंत ची जिल्हा परिषदेची शाळा आहे.

ही शाळा एक शिक्षकी असल्याने येथील शिक्षकाने सुट्टी घेण्यासाठी चक्क एका निवृत्त शिक्षकाला तीनशे रुपये रोजंदारीवर या शाळेची जबाबदारी दिली होती. मात्र तो शिक्षक देखील शाळेच्या बाहेरच असल्याने या विद्यार्थ्यांनी वर्ग खोलीतच पत्ते खेळायला सुरूवात केली. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आताच समोर आले असं नाही या आधीही या विभागाचा भोंगळ कारभार सर्वासमोर आले आहेत.

दरम्यान वारंवार विभागाचा असा कारभार समोर आल्यानंतरही पालघर जिल्हा परिषद म्हणून कोणत्याही उपाययोजना करत नसल्याचं दिसत आहे. शिक्षण विभागाच्या या कारभारामुळे येथील विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. डोंगरपाडा शाळेतील फोटो व्हायरल झाल्यानंतर पंचायती समितीच्या अधिकाऱ्यांना जाग आली. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली.

या धक्कादायक प्रकारानंतर तलासरी गटविकास अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. अहवाल प्राप्त झाल्यावर शिक्षकांवर योग्य कारवाई करण्यात येईल, असा आश्वासन गटविकास अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: पर्थमध्ये पुन्हा टॉस बनणार बॉस? पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय निश्चित? पाहा रेकॉर्ड

Maharashtra Exit Poll: कोल्हापूर उत्तर मतदारसंघामध्ये राजेश लाटकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Indapur Exit Poll : इंदापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार, एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना मोठा झटका

Maharashtra Exit Poll: नंदुरबार मतदारसंघातून विजयकुमार गावित होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll: हातकणंगलेमधून काँग्रेसचे राजू आवळे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT