- सागर निकवाडे
Nandurbar News: धडगाव तालुक्यातील तोरणमाळ शासकीय आश्रमशाळेतील (toranmal government ashram shala) पहिलीमधील विद्यार्थ्याचा आश्रम शाळेत मृत्यू झाला. दाेन दिवसांपासून विद्यार्थी आजारी हाेता अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झालेली आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदना नंतर विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजणार आहे. (Maharashtra News)
तोरणमाळीतील शासकीय आश्रम शाळेत शेकडो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथे शहादा तालुक्यातील साबलापाणी येथील आमदारपाडा येथील डेबा दिला तडवी (वय 7) या विद्यार्थाला दोन दिवसांपासून पोट फुगत असल्याचा त्रास जाणवत होता. मंगळवारी दुपारी चार वाजेपर्यंत डेबा तडवी हा विद्यार्थी झोपेतून उठत नसल्याने त्याला तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.
उपचारापुर्वीच तडवी याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. स्थानिक आश्रम शाळेतील शिक्षकांचा दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याचा आश्रम शाळेत झोपेतच मृत्यु झाल्याचा आराेप करण्यात येत आहे.
तडवी याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला हे अद्यापही अस्पष्ट असून नेमका मृत्यू कशामुळे झाला याची माहिती शवविच्छेदना नंतर समजेल. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तडवी याच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.