Drown,  saam tv
महाराष्ट्र

देवराव भाऊराव पाटील शाळेतील विद्यार्थ्याचा नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू; राधाकृष्ण नगरात शाेककळा

या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) शहरातील राधाकृष्ण नगर जांब रोड परिसरामध्ये इयत्ता सातवीतील विद्यार्थी (student) नाल्यातील पाण्यात पडल्याने त्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना उघडकीस आली. जय शंकर गायकवाड (वय १२, राधाकृष्ण नगर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. (yavatmal latest marathi news)

जय गायकवाड हा लहान वडगाव येथील देवराव भाऊराव पाटील या शाळेत (school) इयत्ता सातवीत होता. आज (साेमवार) तो सकाळी शाळेत गेला मात्र शाळेत पोहोचल्यानंतर विद्यार्थी कमी असल्याच्या कारणाने तो घराकडे परतला. त्याचे पाय चिखलाने भरल्यामुळे तो घराजवळच्या नाल्याजवळ पाय धुण्याकरिता गेला असता पाय घसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच संकल्प फाउंडेशनचे संकल्पसेवक मनोज तामगाडगे व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले व त्याला पाण्याबाहेर काढून शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता नेले. मात्र तो पर्यंत उशिर झाला हाेता. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांचे सुद्धा दुर्दैवी निधन झाले होते. त्याच्या पश्चात आई व आजी आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

SCROLL FOR NEXT