yavatmal
yavatmalsaam tv

वरूड जहांगीरात ढगफुटी; बोरीच्या पुलावरील वाहतूक ठप्प, बाभुळगांवशी गावांचा संपर्क तुटला

बोरीच्या पुलावर पाणी पुन्हा वाहतूक ठप्प.

- संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील राळेगांव तालुक्यातील अनेक गावात पुरस्थिती (flood) निर्माण झाली आहे. वरूड जहांगीर या गावाला पुराच्या पाण्याने वेढा घेतला आहे. गावालगत असलेल्या शेत (farm) जमीन पुराच्या पाण्यामुळे पुर्णच खरडून गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. (yavatmal rain update)

पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळं राळेगांव तालुक्यातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. राळेगांव तालुक्या सारखी पुरस्थिती जिल्ह्यातील अनेक गावांत पाहायला मिळत आहे. एकंदरीत गत आठवडाभर पडलेल्या पावसामुळे (rain) आधीच दीड लाख हेक्टर पेक्षा अधिक शेतातील पिकाचे नुकसान झाले असून आता पुन्हा शेतकरी संकटात सापडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

yavatmal
R Praggnanandhaa : पॅरासिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा प्रज्ञानानंद 'अजिंक्य'; रचला इतिहास

बोरीच्या पुलावर पाणी पुन्हा वाहतूक ठप्प

जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे दारव्हा ते यवतमाळ रस्त्यावरील बोरीअरब या गावातील या गावातील अडाण नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे येथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज (साेमवार) पहाटेच्या सुमारास पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या पुलावरून पाणी वाहू लागले. त्यामुळे हा पुल वाहतुकीकरिता बंद करण्यात आला आहे असे प्रशासनाने कळविले. सकाळपासूनच जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

yavatmal
Buldhana : कर्जबाजारीपणाला कंटाळून वडगावातील शेतकऱ्याची आत्महत्या

बाभुळगांव तालुक्यात सर्वच गावांचा संपर्क तुटला

रविवारी रात्री पासून जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला आहे. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान झाल्याने बेबळा प्रकल्पाचे १८ ही दरवाजे उघडण्यात आले आहेत. येथे माेठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे .त्यामुळे बाभुळगांव तालुक्यातील सर्वच गावांचा संपर्क तुटला आहे. बेबळा नदीला पुर आल्याने सर्व नाल्यांना ही पुर आला आहे. बाभुळगांव तालुक्यातील अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

yavatmal
Amravati : निभोरा फाट्यानजीक अपघात; सहा ठार, चांदूर बाजार तालुक्यातील एक जखमी
yavatmal
दामिनी पथकाची धाडसी कारवाई; BOI चं एटीएम केंद्र फाेडणा-यांवर मारली झडप, एक अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com