kishor shelke, farmer, buldhana
kishor shelke, farmer, buldhanasaam tv

Buldhana : कर्जबाजारीपणाला कंटाळून वडगावातील शेतकऱ्याची आत्महत्या

पेरणीला पैसे नसल्याने त्यांना शेती ठेका पद्धतीने द्यावी लागली हाेती.
Published on

बुलडाणा : अल्पभूधारक शेतकऱ्याने (farmer) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (buldhana) मोताळा तालुक्यातील वडगाव येथे घडली. किशोर श्रीकांत शेळके (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या मागे वडील, भाऊ, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. (buldhana latest marathi news)

किशोर शेळके यांच्याकडे साडेतीन एकर कोरडवाहू शेती आहे. सततची नापिकी व कर्जाचा वाढता बोजा यामुळे ते चिंतेत होते. नापीकीमुळे शेतीला लावलेला खर्चही निघत नव्हता. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते होते. त्यामुळे रविवारी दुपारी घरात एकटेच असताना धाब्याच्या घरातील लाकडी दांड्याला त्यांनी गळफास घेतला.

kishor shelke, farmer, buldhana
शेतक-यांनाे! नऊ पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश; जुलै अखेर करा अर्ज

या घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी (police) घटनास्थळी धाव घेतली. परंतु वेळ निघून गेली हाेती. पाेलिसांनी घटनेचा पंचनामा केला. किशोर शेळके यांच्यावर बुलडाणा जिल्हा केंद्रीय बँक शाखा मोताळा, ग्रामीण बँक शाखा मोताळा यांचे २ लाख व इतर काही लोकांचे खाजगी कर्ज होते. यावर्षी पेरणीला पैसे नसल्याने त्यांनी शेती दुसऱ्याला ठेक्याने दिली होती.

Edited By : Siddharth Latkar

kishor shelke, farmer, buldhana
दामिनी पथकाची धाडसी कारवाई; BOI चं एटीएम केंद्र फाेडणा-यांवर मारली झडप, एक अटकेत
kishor shelke, farmer, buldhana
Amravati : निभोरा फाट्यानजीक अपघात; सहा ठार, चांदूर बाजार तालुक्यातील एक जखमी
kishor shelke, farmer, buldhana
R Praggnanandhaa : पॅरासिन ओपन बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा प्रज्ञानानंद 'अजिंक्य'; रचला इतिहास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com