पंढरीत लॉकडाउन Saam Tv
महाराष्ट्र

पंढरपुरातील २१ गावांत आजपासून कडक लॉकडाउन

भारत नागणे

पंढरपूर ः महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा हात-पाय पसरायला सुरूवात केली आहे. नगरसह सोलापूर जिल्ह्यात रूग्णसंख्या वाढताना दिसत आहे. विठूरायाच्या पंढरीतूनही कोरोना हटायला तयार नाही. आषाढी वारीमुळे महाराष्ट्रात प्रादूर्भाव वाढू शकतो, या शक्यतेने महाराष्ट्र सरकारने वारीवर निर्बंध लादले. त्यामुळे वैष्णवांचा मेळा भरू शकला नव्हता. असे असतानाही पंढरपूर तालुक्यात रूग्णसंख्या झपाट्याने वाढते आहे.

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने दहापेक्षा अधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या पंढरपूर‌ तालुक्यातील 21 गावांमध्ये आजपासून चौदा दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला आहे.

या संदर्भात येथील प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी काल संबंधित गावातील सरपंच व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये कोरोना रुग्ण संख्या कमी करण्यासाठी 21 गावांमध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

पुढील 14 दिवसांसाठी हा‌ लॉकडाउन असणार आहे.

या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व आस्थापने व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. या गावांमध्ये बाहेरगावच्या व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार नाही. या शिवाय कोरोना चाचणी व लसीकरण (vaccination) मोहीम राबवली जाणार असल्याचेही प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले.

मागील 13 ऑगस्ट रोजी पंढरपूरसह 5 तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला होता. दहा दिवसांच्या कडक लॉकडाउननंतर काही निर्बंध शिथिल केले आहेत. त्यानंतरही पंढरपूर तालुक्यांमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा तालुक्यातील 21 गावांमध्ये लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला. आज तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी गावोगावी जाऊन बंदचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धोरणात हिंदी, भाषणात मराठी, ठाकरे गटाचा दुटप्पीपणा जनतेला मान्य नाही - बावनकुळे

Sushil Kedia: काल म्हणाला मराठी बोलणार नाही, आज सुतासारखा सरळ झाला; सुशील केडीया म्हणाला मराठी फडाफडा बोलेल, पाहा VIDEO

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

SCROLL FOR NEXT