stray dog
stray dog  Saam Tv
महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांची सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतलीय धास्ती; नेमकं काय घडलं होतं?

साम टिव्ही ब्युरो

नागपूर: येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (Nagpur Government Hospital) भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गेल्या आठ दिवसांत भटक्या कुत्र्यांनी चार डॉक्टरांवर हल्ला केला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यात (Dog bite) एक महिला डॉक्टर गंभीर जखमी झाली असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरु आहेत. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळं नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कुत्र्यांचे हल्ले वाढत असल्याने डॉक्टरांनी आंदोलन (Doctor Strike) करण्याचा पवित्रा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या दहशती विरोधात डॉक्टर आंदोलन करणार असल्यामुळं प्रशासनाचे धाबे दणाणले आहे.

मार्डचे अध्यक्ष डॉ.सजल बन्सल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दोन डॉक्टरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय. यातील एक महिला डॉक्टर अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे. गेल्या आठ दिवसात चार डॉक्टरांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढत चाललाय. त्यामुळेच मोकाट कुत्र्यांसाठी डॅाक्टर्स आंदोलन करणार आहे, मोकाट कुत्र्यांसाठी डॉक्टरांना आंदोलन करण्याची राज्यातील कदाचित ही पहिलीच घटना असेल.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live :अमोल कोल्हे भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते; प्रविण दरेकर यांचा दावा

Pimpri Chinchwad News : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय; चार मुलींची सुटका

Janhvi Kapoor: जान्हवीच्या फोटोशूटची चर्चा; गळ्यात कोणाच्या नावाचं नेकलेस?

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT