केदार दिघेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उत्तर दिलं, उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

केदार दिघे यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदावर नियुक्ती केल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापलं आहे.
Uddhav thackeray
Uddhav thackeray saam tv

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवून शिंदे-फडणवीस सरकारचे नवे पर्व सुरु करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) यांनी 'दिघे कार्ड'बाहेर काढले आहे. ठाण्याचे खासदार राजन विचारे ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि विचारे गट यांच्यात ठाण्यात राजकीय घमासान सुरु झाले आहे. अशातच रविवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे (Kedar Dighe) यांची शिवसेनेच्या ठाणे जिल्हाप्रमुखपदावर नियुक्ती केल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केलंय. एकनाथ शिंदे यांना केदार दिघेंनी उत्तर दिले आहे, अशी टीका ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे यांच्यावर केली आहे.

Uddhav thackeray
'महाराष्ट्रात फक्त भाजप राहणार...; जे. पी. नड्डांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो, माझ्या डोक्यात हवा गेली नाही. पदे मिळतात आणि जातात. लोकांशी नम्र राहा. आज मात्र यांच्या डोक्यात हवा गेलीय. निर्घृणपणे वागू नका, असं म्हणत ठाकरे यांनी नाव न घेता शिंदे यांच्यावर तोफ डागली. माध्यमांशी बोलताना ठाकरे पुढे म्हणाले, ' सर्व लोकांनी डोळे, कान उघडून देश कुठे चालला आहे, भाजप (BJP) कुठे नेऊ इच्छित आहे, त्यांना मदत करायची का हे ठरवायची वेळ आहे. जे.पी.नड्डा यांचं देशात फक्त भाजप टिकणार हे वक्तव्य देशाला हुकूमशाहीकडे नेण्याचे आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

Uddhav thackeray
Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार? नांदेडमध्ये चर्चांना उधाण

संजया राऊत यांना ई़डीने काल उशीरा रात्री अटक केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या भांडूप निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याबाबतही ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांच्यासोबत माझे कौंटुबिक संबंध आहेत. संजय राऊत कट्टर शिवसैनिक आहेत. पत्रकार शिवसैनिक आहेत. त्यांना जे पटत नाही त्या गोष्टींवर ते बोलत असतात. काल ह्यांचा मुखवटा बाहेर आला. भाजप पोटातील ओठावर आले. कोणतरी दलाल म्हणाला आता आमदार खासदार शोधावे लागतील. पण माझ्याकडे दमदार आहेत, अशा कठोर शब्दात ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com