Parli Crime Saam Tv
महाराष्ट्र

Parli Crime: परळीमध्ये दोन गटात तुफान हाणामारी

संभाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल...

विनोद जिरे

बीड: बीडच्या (Beed) परळीत (Parli Vaijnath) दोन राजकीय गटात हाणामारीची (Fighting) धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली आहे. सदरील घटनेत दोन्हीही बाजूचे कार्यकर्ते जखमी झाले आहेत. नगरपालिका (Municipality) निवडणुक (Election) ऐन तोंडावर आलेल्या असतांना, कायदा (Law) आणि सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहेत.

हे देखील पहा-

परळीतील संभाजी नगर पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीतील गणेशपार रोडवर दोन राजकीय (Political) गटात भांडण झाली आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक (Corporator) दीपक देशमुख आणि माजी नगरसेवक धनंजय कराळे यांच्यात ही भांडणे झाली आहेत. दरम्यान कराळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून माजी नगराध्यक्ष दीपक रंगनाथराव देशमुख, मुकुंद दीपक देशमुख, निलेश देशमुख, गणेश देशमुख, सुनील देशमुख यांच्यावर कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश दिपकराव देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महेशनाना कराळे, धनंजय कराळे आणि ओम कराळे यांच्यावर संभाजीनगर ठाण्यात कलम 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 505, 427 भादंवी नुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी (election) राजकीय गटात हाणामारी झाल्याने, वातावरण चांगलेच तणावाचे बनले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paratha Recipe : सकाळी घाई असते? फक्त १० मिनिटांत मुलांसाठी बनवा 'हा' पराठा; नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: दुर्दैवाने अजित पवारांना मुख्यमंत्री होता आलं नाही : फडणवीस

Chennai Golden Beach: महाराष्ट्रातल्या ७ भावी इंजिनिअर्सचा चेन्नईत मृत्यू, सेल्फी घेताना बीचवर नेमकं काय घडलं?

PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? तुमच्या खात्यात ₹२००० जमा होणार की नाही? चेक करा स्टेट्स

Mumbai Pune Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुन्हा गॅस टँकरचा अपघात, ब्रेक फेल झालं अन्...

SCROLL FOR NEXT