Aurangabad: नवरदेवाला खावी लागली जेलची हवा; तलवार आणि जांबिया चाकू जप्त...VIDEO VIRAL

औरंगाबाद मधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे.
Aurangabad: नवरदेवाला खावी लागली जेलची हवा; तलवार आणि जांबिया चाकू जप्त...VIDEO VIRAL
Aurangabad: नवरदेवाला खावी लागली जेलची हवा; तलवार आणि जांबिया चाकू जप्त...VIDEO VIRALSaam Tv
Published On

अविनाश कानडजे

औरंगाबाद: लग्नसमारंभाअगोदरच हळदी समारंभात बॅन्जो, डिजेच्या तालावर सर्वचजण थरकत असतात. पण औरंगाबाद (Aurangabad) मधून एक वेगळीच बातमी समोर आली आहे. हळदी समारंभामध्ये अतिउत्साही नवरदेवाने चक्क तलवार नाचवली आहे. (Haldi celebration) याची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले आणि हळद लागलेल्या या नवरदेवाला हळदीच्या कपड्यातच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकले आहेत. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल (social media) होत आहे. (Sword dance in Aurangabad, groom arrest by Police from Haldi function)

पहा व्हिडिओ-

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद (Aurangabad) मधील ही घटना आहे. हळदी समारंभामध्ये (Haldi function) नवरदेवाचे मित्र बेधुंद नाचत होते. यानंतर नवरदेवाला देखील आपल्याबरोबर घेतले आहे. यावेळी नवरदेवाने आपल्या हातात तलवार घेत डान्स (Dance) सुरू केला आहे. मात्र, तलवार नाचवणे या नवरदेवाला चांगलेच महागात पडले आहे. तलवार डान्समुळे पोलिसांनी नवरदेवासह त्याच्या मित्रांना देखील बेड्या ठोकले आहेत.

Aurangabad: नवरदेवाला खावी लागली जेलची हवा; तलवार आणि जांबिया चाकू जप्त...VIDEO VIRAL
Galwan Valley: गलवान चकमकीत 38 चीनी सैनिक ठार; चीनचा पोलखोल

तलवार घेऊन हळदीच्या कार्यक्रमात बेधुंद नाचत असतानाचा नवरदेवाचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियात जोरदार व्हायरल (Viral) झाला आहे. नवरदेवाबरोबरच मित्रांना मस्ती महागात पडली आहे. नवरदेवाबरोबरच त्याच्या ६ मित्रांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. पुंडलिक नगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या सर्वांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com