Nurse Strike Saam Tv
महाराष्ट्र

Nurse Strike: राज्यभरातील परिचारिकांचे आंदोलन, सरकारला दिला थेट इशारा; ७ प्रमुख मागण्या कोणत्या?

Maharashtra Nurse Strike: राज्यभरामध्ये सध्या परिचारीकांचे आंदोलन सुरू आहे. वेगवेगळ्या ७ प्रमुख मागण्यांसाठी ते आंदोलन करत आहे. सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर आंदोलन सुरूच राहिल असा इशारा देण्यात आला आहे.

Priya More

राज्यभरातील परिचारिकांनी आज कामबंद आंदोलन सुरु केलं आहे. विदर्भासह राज्यभरातील १५ ते २० हजार परिचारिका या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. नागपूरच्या मेडिकल आणि मेयो हॉस्पिटलमधील नर्सेसही कामावर अनुपस्थित आहेत. नर्सिंग अलाउंस आणि जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी हे आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होतोय.

नागपूरसह विदर्भातील परिचारीकांचं आज कामबंद आंदोलन सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील १ हजार पेक्षा जास्त परिचारिकांनी आज कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिचारिकांच्या या आंदोलनामुळे रुग्णसेवेवर परिणाम होणार आहे. या परिचारिकांनी नर्सेसची खासगी भरती बंद करण्याची मागणी केली आहे. परिचाररिका संघटनेच्या महाराष्ट्र राज्य सहसचिव जयश्री शरथ यांनी सांगितले की, 'आज सकारात्मक निर्णय सरकारने न घेतल्यास आंदोलन सुरूच राहिल आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झाल्यास सरकार जवाबदार असणार आहे. कारण यापूर्वी सुद्धा आम्ही अनेकदा निवेदने दिले. पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे.'

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य परिचारिकानी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे. राज्य शासनाने आम्हाला कोविड काळातील भत्ता द्यावा, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर झाली पाहिजे,आम्हाला गणवेश भत्ता मिळाला पाहिजे, एन जी पी वाय चा थकीत भत्ता अजून पर्यंत शासनाने आम्हाला दिला नाही तो तात्काळ शासनाने आम्हाला द्यावा, यासोबतच कंत्राटी पद्धतीने पदनिर्मिती बंद करून नियमित पद भरती शासनाने तात्काळ करावी, या मागणीसाठी आरोग्य सेविकांनी आज जोरदार घोषणा दिल्या. तर आमच्या मागण्या शासनाने तात्काळ मान्य न केल्यास आम्ही अजून आंदोलन तीव्र करू असा इशारा यावेळी परिचारिकांनी दिला आहे.

तर संभाजीनगरमध्ये देखील परिचारीका मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. राज्यातील परिचारिकांच्या बाह्य-स्त्रोताद्वारे पदभरती निषेधार्थ आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आज राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील परिचारिका सहभागी झाल्या आहेत. शासनस्तरावर परिचारकांच्या मागण्याची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी या आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

परिचारीकांच्या नेमक्या मागण्या काय?

१) वेतन तृटी निवारण

२) नर्सेसचं खाजगीकरण बंद करा

३) नर्सिंग भत्ता मिळावा

४) गणवेश भत्ता मिळावा

५) १०० टक्के कायमस्वरूपी पदभरती आणि पदोन्नती व्हावी

६) शैक्षणिक वेतनवाढ मिळावी

७) खासगीकरण दूर करावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात गोल्फ क्लब उड्डाण पुलावर दहा गाड्या एकमेकांना धडकल्या

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

White Clothes: अंत्यसंस्कारावेळी पांढरे कपडे का घालतात? कारण वाचून व्हाल आश्चर्यचकीत

डोनाल्ड ट्रम्प यांना बसला टॅरिफचा 'डंक'; सहा देशांकडून F-35 लढाऊ विमानांचा करार रद्द

ऐन निवडणुकीत गोळीबार, कुख्यात गुन्हेगाराची गोळ्या झाडून हत्या, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT