'राज्यात नेमकं चाललंय काय? आधी पोलीस आयुक्त, नंतर गृहमंत्री आणि आता मुख्यमंत्रीही गायब'
'राज्यात नेमकं चाललंय काय? आधी पोलीस आयुक्त, नंतर गृहमंत्री आणि आता मुख्यमंत्रीही गायब' Saam Tv
महाराष्ट्र

'राज्यात नेमकं चाललंय काय? आधी पोलीस आयुक्त, नंतर गृहमंत्री आणि आता मुख्यमंत्रीही गायब'

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : साम-सकाळच्या (Saam-Sakal) बातमीची भाजपकडूनही दखल घेण्यात आली असून आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शेंद्रीपाड्यावर जावून तेथील महिलांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसंच आता तिथे लोखंडी साकव बांधले असले, तरी तिथे पूल बांधण्याची गरज असून तो पूल बांधण्यात यावा अशी विनंती त्यांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) केली आहे.

शेंद्रीपाडा, सावरपाडा आणि परिसरातील आदिवासी महिला, बांधवांचे अन्य प्रश्नही सोडवण्याची गरज असून जिल्ह्यातील 50 टक्के आदिवासी बांधवाना खावटी योजनेचं अनुदान मिळालेली नाही. नंदुरबार (Nandurbar)जिल्ह्यातही आदिवासी बांधवांच्या आरोग्य सुविधांचा प्रश्न गंभीर असून एकट्या नंदुरबार जिल्ह्यात 31 मातांचा असुरक्षित बाळंतपणात बळी गेला आहे. या बालमृत्यू, माता मृत्यूंची जबाबदारी कुणाची? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

हे देखील पहा -

दरम्यान त्या म्हणाल्या राज्यात अपहरणाच्या घटना वाढतायत राज्यात 25 हजार महिला, मुली गायब आहेत महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय?आधी पोलीस आयुक्त गायब झाले, नंतर गृहमंत्री गायब झाले आणि मुख्यमंत्रीही गायब आहेत. नाशकात (Nashik) दिवसाढवळ्या मुलींची छेड काढली जातेय, अपहरणाचा प्रयत्न होतो, पोलीस यंत्रणा कुठंय? असा संतप्त सवालही चित्रा वाघ यांनी यावेळी उपस्थित केला.

माझ्या पोलिटीकल करियरची काळजी करू नये -

सध्या सर्वचं घटकांमध्ये अस्वस्थता सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का? अशी शंका यावी अशी परिस्थिती गुंडांना, बलात्काऱ्यांना सरकारकडून अभय भाजपच्या (BJP) लोकांवर दणादण गुन्हे दाखल होतात, गुंडांवर-बलात्काऱ्यांसाठी IPC चे कलम नाही का? माझ्या पोलिटीकल करियरची कुणीही काळजी करू नये असही त्या यावेळी म्हणाल्या.

Edited By -Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Lok Sabha: सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून नोटीस, नेमकं कारण काय?

Maharashtra Politics: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर धैर्यशील मोहिते पाटलांनीही थोपटले दंड; माढ्याच्या मैदानात आरपारची लढाई

Raigad News: ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांच्या कारवर हल्ला; आमदार पुत्रासह २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा

Lok Sabha 2024: काँग्रेसचं ठरलं! राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार; अमेठीतून तगडा उमेदवार मैदानात!

Horoscope Today : तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय? वाचा आजचे संपूर्ण राशिभविष्य

SCROLL FOR NEXT