महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाला अटक! SaamTvnews
महाराष्ट्र

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षाला अटक!

महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षाविरोधात नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष जोशी

नांदेड : महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षाविरोधात नांदेड मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माधव दादाराव देवसरकर असं विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी देवसरकरला आज अटक केली आहे.

हे देखील पहा :

चार दिवसांपूर्वी पिडीत महिलेने माधव देवसरकर विरोधात, रात्री अपरात्री मॅसेज करणे, डोळा मारणे असे अश्लील प्रकार केल्याची तक्रार पोलिसात दिली होती. यावेळी पोलिसांनी ५०९ प्रमाणे केवळ गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी काल कलम ३५४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, माधव देवसरकर कडून मला आणि माझ्या कुटुंबियांच्या जिवीताला धोका आहे. त्यामुळे आम्हाला संरक्षण द्यावे अशी लेखी मागणी पिडीत महिलेच्या पतीने पोलिसांकडे केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission Update: 3.25 फिटमेंट फॅक्टरची मागणी चर्चेत; केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट

Actress Death: चित्रपटसृष्टीला मोठा धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Chikoo Benefits: डायबिटीज असलेली व्यक्ती चिकू खाऊ शकते का? जाणून घ्या

Cyclone Arnab: चक्रीवादळ अर्नब येणार? 3 राज्यांत वर्षातील पहिल्या वादळाचा धोका, मुसळधार पावसाचा अलर्ट!

SCROLL FOR NEXT