शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; गीतेंचा आरोप खोटा : आठवले

उलट सुलट आरोप करत संजय राऊत यांनी वेळ वाया घालवू नये राज्याच्या विकासाकडे लक्ष द्यावे, आठवलेंनी दिला राऊतांना सल्ला...
शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; गीतेंचा आरोप खोटा : आठवले
शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; गीतेंचा आरोप खोटा : आठवले प्रदीप भणगे
Published On

कल्याण : कल्याण पश्चिमेत एका खाजगी मीटिंगीसाठी केंद्रीयमंत्री रामदास आठवले आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना माजी खा. अनंत गीते यांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपाबाबत बोलताना सांगितले की, शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केलाय , मात्र 1998 मध्ये शरद पवार यांना काँग्रेस मधून काढलं होतं त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नाही, तर काँग्रेसने शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे त्यामुळे असे आरोप करणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले.


हे देखील पहा :

तसेच संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रूपयाचा माणहणीचा दावा करणार त्यांची तेवढीच त्यांची किंमत असल्याची टीका केली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर देताना त्यांनी सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी. संजय राऊतांची मानहानी सव्वा रुपयांची नक्कीच नाही असा टोमणा मारला. राज्यात सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपाबाबत बोलताना केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की सध्या उलट सुलट आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. संजय राऊत खासदार आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते, नेते आहेत. त्यांना अशा प्रकारचे आरोप करत वेळ खर्च करण्याची आवश्यकता नाही अस सल्ला राऊत यांना दिला.

शरद पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला; गीतेंचा आरोप खोटा : आठवले
बीड कि बिहार? भर चौकात भाजी विक्रेत्या महिलेला शरीरसुखाची मागणी!

भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भाजप मध्ये आलेत त्यांचे पुरावे असतील इतरांनी बाहेर काढावे - रामदास आठवले यांचे विरोधकांना आवाहन :

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपापसात आरोप सुरू आहेत. किरीट सोमय्या यांनी अनेक लोकांच्या भ्रष्टाचाराबाबत तक्रार करत ईडीला पुरावे दिले आहेत. साखर कारखाने व इतर उद्योग करायला काही हरकत नाही. मात्र, त्यात भ्रष्टाचार व अनियमितता असता कामा नये. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले बहुतेक आमदार मंत्री भाजप मध्ये गेलेत याबाबत बोलताना रामदास आठवले यांनी असे आमदार मंत्री भाजप मध्ये आले असतील तर इतरांनी त्यांचे पुरावे बाहेर काढावेत असे आवाहन विरोधी पक्षांना केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com