Pandharpur Politics 
महाराष्ट्र

Pandharpur Politics: आखणी एका घरात फूट पडणार? दोन भावांमध्ये वाढणार राजकीय वैर?

Solapur Politics : सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत वेगळा निर्णय घेण्यच्या विचारात आहेत. अनेक वर्ष सेवा करूनही मेवा मिळत नसल्यानं त्यांनी आपली खदखद नागरिकांपुढे बोलून दाखवलीय.

Bharat Jadhav

भारत नागणे, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी होताहेत. वाढलेल्या राजकीय महत्त्वकांक्षामुळे नेत्यांच्या घरात फूट पडलीय. राज्यातील राजकारणात सक्रीय असलेल्या पवार कुटुंब, आत्राम, आणि भुजबळ कुटुंबात फूट पडलीय. आता आखणी एका राजकारणात सक्रीय असलेलं कुटुंबात फूट पडण्याची शक्यता आहे.

राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या घरात फूट पडणार आहे. काका-पुतण्या, वडील-लेक, बाप-लेकानंतर आता दोन भावांमध्ये राजकीय वैर निर्माण होण्याची शक्यता आहे.

माढा विधानसभा मतदार संघात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तानाजी सावंत यांचे बंधू आणि सोलापूर जिल्हा शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत शिवसेनेत नाराज आहेत. माढ्यात ते वेगळा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. तसे त्यांनी आज स्पष्ट संकेत दिले आहेत. आता कोणत्या आदेशाची चिंता करू नका, जो आदेश निघेल तो सावंत बंगल्यावरून निघेल. जर ३२ वर्ष सेवा करूनही काही मिळत नसेल तर चाकोरी का करायची? असा सवाल करत त्यांनी आपली खदखद जनतेसमोर बोलून दाखवली.

उमेदवारी मिळाली नसल्यानं शिवाजी सावंत नाराज झालेत. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांना पंढरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारी दिलीय. अनिल सावंत यांच्यासमोर भाजपच्या उमेदवाराचं आव्हान आहे. परंतु या जागेसाठी शिवाजी सावंत हे इच्छुक होते. यामुळे शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे पक्षात नाराज असल्याचे समोर आले आहे. सोलापूर मध्य विधानसभा मतदार संघातून त्यांनी शिवसेनेतकडे उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले.

पण ती जागा भाजपला सोडली त्यामुळे सावंत हे नाराज झालेत. त्यानंतर आज माढ्यात सावंत यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात अनके कार्यकर्त्यांनी पक्षाने डावल्याची भावना व्यक्त करत वेगळा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तोच धागा पकडून शिवाजी सावंत यांनी ही पक्षावर नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांच्या मनातील निर्णय घेतला जाईल असं सांगितले. तसेच यापुढचा जो निर्णय होईल तो फक्त सावंत बंगल्यावरून होईल, असा इशारा ही सावंत यांनी दिलाय.

मेळाव्यात बोलतांना शिवाज सावंत म्हणाले, तालुक्यातील अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. तालुक्याला कामे करणारा व्यक्ती हवा. त्यामुळे आपण वेगळा निर्णय घेणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरील दु:ख दिसून येत आहे. त्यामुळे काही तरी परिवर्तन झालं पाहिजे. तालुक्याचा विकास झाला पाहिजे. पुढच्या पिढीचं राजकारण सोपं गेलं पाहिजे. असं म्हणत त्यांनी वेगळी वाट निवडणार असल्याचं सुचित केले आहे. शिवाजी सावंत यांचा माढा, पंढरपूर, अक्कलकोट, मध्य सोलापूर या मतदार संघात प्रभाव आहे. त्यामुळे सावंत हे सध्या किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. ते कोणती राजकीय भूमिका घेतात याकडेच लक्ष लागलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे हॉस्पिटलमध्ये; सरेंडरसाठी ४ दिवसांचा वेळ मागितला, पण...

'ED ने राहुल गांधींची बदनामी केली', मुंबईत काँग्रेस आक्रमक, थेट कार्यालयावर मोर्चा

Kitchen Hacks : घरात पंख्यावर खूपच धुळ बसली? मग 'या' सिंपल ट्रिक्सने करा स्वच्छ

White Sesame Seeds Benefits: थंडीत रोज सकाळी एक चमचा सफेद तीळ खल्ल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Maharashtra Live News Update: निवडणूक आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक्साईज विभागाची धडक कारवाई, ७० लाखांचा बेकायदेशीर दारू साठा जप्त

SCROLL FOR NEXT