Aditya Thackeray on Shinde Group saam tv
महाराष्ट्र

Aditya Thackeray: गद्दारांच सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात पडणार - आदित्य ठाकरे

Aditya Thackeray on Shinde Govt: नाशिकच्या नांदगाव येथे बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

Chandrakant Jagtap

>>निवृत्ती बाबर

Aditya Thackeray on Shinde Group: गद्दारांच सरकार येत्या दोन ते तीन महिन्यात पडणार, अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर टिका केली आहे. नाशिकच्या नांदगाव येथे बोलताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. आदित्य ठाकरे राज्यात संवाद यात्रा घेत आहेत.

तत्पुर्वी विंचुर येथे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांमध्ये जाता येत नाही. बुरा वक्त आया है, वो जायेगा असे म्हणत मी काय केंद्राची जाहिरात करत नाही असे ते म्हणाले.

शिंदे गटावर टिका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात तेव्हा खोके वाटले जातात, पण तरीही खुर्च्या रिकाम्या असतात. उद्धव साहेबांनी जी घोषणा केली, ती पूर्ण केली याचा मला आनंद आहे. आता राज्यात अतिवृष्टी झाली त्याचे पैसे कोणाला मिळाले का? अजून कोणालाच पैसे मिळाले नाहित.

हे सरकार शेतकऱ्यांच ऐकत असं तुम्हाला वाटतंय का? मदत सोडा, पण कृषीमंत्री कोण आहेत, हे ही लोकांना माहिती नाही. त्यांच्या मतदार संघात जाऊन आलो, पण तिथेही ते दिसत नाहीत, असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Latest Marathi News)

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, उद्योग बाहेर गेले आहेत, राजकीय अस्थिरतेमुळे रोजगार येत नाहीयेत. कधीही एवढं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात नव्हतं. हे सरकार पडणार म्हणजे पडणार हे लिहून घ्या. माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, मी तुमच्याकडून घ्यायला आलेलो आहे. मला तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या. सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे, हे राजकारण बदलायचे आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

याआधी जेव्हा जेव्हा लोकांनी पक्ष बदलले, तेव्हा तेव्हा ते राजीनामा देऊन लढले आणि जिंकून आले. पण हे तयार नाहीत. मला एक जण म्हणाला की तुमचं डिपॉजिट जप्त होईल. ठिक आहे, आधी लढा मग बघू. कारण शिवसेना ठाण्याची आहे आणि ठाणे शिवसेनेच आहे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rail Update: जळगाव-मनमाड चौथ्या रेल्वे मार्गिकेला मंजूरी, शेतकऱ्यांसाठीही महत्त्वाची घोषणा

Viral Video: कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडीचा VIDEO पाहाच

Bhiwandi : भिवंडी गूढ धक्क्यांनी हादरली, भूकंप की आणखी काही, शहरात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून मिळणार? तारीख काय? जाणून घ्या

Horoscope Today : शिव उपासना फलदायी ठरेल, तर कोणाला मिळेल नवी दिशा आणि नवीन मार्ग; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT