Narendra Patil : ...तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आडनाव बदलावे; नरेंद्र पाटील असे का म्हणाले?

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
Narendra Patil News
Narendra Patil News Saam tv
Published On

Narendra Patil News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

'जितेंद्र आव्हाड हे पिसाळलेले आहेत. अफजल खान लोकांचे समर्थन करत असेल तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आडनाव बदलावे, असा घणाघात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. ते बीडमध्ये बोलत होते. (Latest Marathi News)

नरेंद्र पाटील म्हणाले, 'जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघात भोंग्याचे आवाज वाढले आहेत. त्यामुळे ते स्वतः कोण आहे ? त्याचा विसर त्यांना पडला आहे. जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) जे बोलतात त्यांचे बापजादे आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची हीच भूमिका आहे का ? शरद पवारांची हीच भूमिका आहे का? असा प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला.

Narendra Patil News
Video : अदानी वादावरून राहुल गांधी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल; व्हिडिओ पाहाच

राष्ट्रवादीच्या आमदारांनी जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्याचा विचार करून अफजल खानच्या स्वरूपाच्या विचार करणाऱ्या लोकांचे समर्थन करत असाल तर कृपया करून आपले आडनावे बदली करा. जे जितेंद्र आव्हाड यांचे वक्तव्य आहे ते हिंदुत्व आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात आहे, असं देखील नरेंद्र पाटील (Narendra Patil) म्हणाले.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामा नाट्य संदर्भात विचारले असता बाळासाहेब थोरात यांनी लवकरच डॉ. सुधीर तांबे यांच्या मुलासारखा योग्य निर्णय घ्यावा. कारण काँग्रेस आता जास्त काळ टिकणार नाही, असं देखील नरेंद्र पाटील म्हणाले.

Narendra Patil News
Rahul kalate : राहुल कलाटेंनी वाढवलं राष्ट्रवादीचं टेंशन! चिंचवडमधून अपक्ष अर्ज दाखल

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

'एमपीएसीमधून महाराष्ट्राचा इतिहास हा विषय गायब करून टाकला होता. एके दिवशी तावडे विधानसभेत म्हणाले की आम्ही पुस्तकातून मुघलांचा इतिहास काढून टाकणार. मग मी म्हणालो की मग छत्रपती शिवाजी महाराज हे गोट्या खेळत होते, असे दाखवणार का? समोर औरंगजेब ठेवला म्हणून शिवाजी महाराज आहेत. अफजलखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना,असे आव्हाड म्हणाले होते.

'शाहिस्तेखान आहे म्हणून शिवाजी महाराज आहेत ना. यातूनच शिवाजी महाराज राज्यकारभार कसा चालवतात हे जगासमोर आहे ना. 1669 साली दुष्काळ होता. तेव्हा आपल्या तिजोरीचे टाळे उघडून शेतकऱ्यांमध्ये पैसे जाऊद्या, हे सांगणारे जगातील पहिले राजे शिवाजी महाराज होते,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com