Ajit pawar news
Ajit pawar news Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: अजित पवार यांच्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश

Ruchika Jadhav

सागर आव्हाड, प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी एका प्रचारसभेत केलेल्या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतलीये. राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या वक्तव्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवारांचं विधान काय होतं?

इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, काय लागेल को निधी द्यायला सहकार्य करू. पाहिजे तेवढा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण कचाकचा दाबा, म्हणजे याने मलाही बरे वाटेल. नाही तर निधी मिळाली नाही तर मला बोलू नका, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं.

निवडणूक आयोगाने दखल घ्यावी - रोहित पवारांची मागणी

अजित पवारांचं हे वक्तव्य सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. तसेच राजकीय वर्तुळातही याने खळबळ उडाली. विरोधकांनी याबाबत तक्रार दिली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दखल घ्यावी अशी मागणी केली होती.

अजित पवारांचं स्पष्टीकरण

आपल्या वक्तव्याबाबत अजित पवारांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. माझ्या वाक्यात ध चा मा केला गेला. मी हे सर्व गमतीत म्हटलो होतो. मी कायम विचार करून विचारपुर्वक बोलततो, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं.

आज राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. पहिल्याच दिवशी अजित पवारांच्या या वक्तव्याची निवडणूक आयोगाने दखल घेतलीये. तसेच चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gujarat News: दहावीत मिळवले ९९.७० टक्के गुण, बोर्डातील टॉपर; निकालानंतर चौथ्या दिवशी विद्यार्थिनीचा ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू

नवी मुंबई : बनावट नोटांच्या छापखान्यावर पाेलिसांची धाड, 2 लाखांच्या नाेटा जप्त; युवकावर गुन्हा दाखल

Today's Marathi News Live : शेवाळेवाडीत कंटेनरचा अपघात, चालक आणि क्लीनरचा मृत्यू अपघातात मृत

SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

Hording Collapse : पुणे-सातारा महामार्गाजवळ होर्डिंग कोसळलं; परिसरात आणखी छोटे-मोठे होर्डिंग, नागरिकांनी व्यक्ती केली भीती

SCROLL FOR NEXT