Ajit Pawar : बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मोठी खबरदारी; अजित पवारांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Ajit Pawar latest News : बारमती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी मुख्य लढत असणार आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीने मोठी खबरदारी घेतली आहे.
Ajit pawar news
Ajit pawar newsSaam tv

अक्षय बडवे, पुणे

बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या बारमती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी मुख्य लढत असणार आहे. या बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीने मोठी खबरदारी घेतली आहे. या मतदारसंघात अजित पवार यांनी कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून उमेदवारीचा अर्ज घेतला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून सचिन दोडके यांनी अर्ज घेतला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे आणि महायुतीकडून सुनेत्रा पवार या १८ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच या मतदारसंघात अर्ज काही कारणांनी छाननीमध्ये रद्द झाल्यास उमेदवारीबाबात प्रश्न उभा राहू नये म्हणून दोन्ही पक्षांकडून अधिकचा उमेदवारी अर्ज घेतला आहे.

Ajit pawar news
Vishal Patil News: विशाल पाटील लोकसभा लढण्यावर ठाम! सांगलीतून मोठी अपडेट समोर

महाविकास आघाडी आणि महायुतीकडून खबरदारी

दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून उमेदवारी अर्ज घेण्यात आले आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेण्यात आला आहे, तसेच अजित पवार यांच्या नावानेही अर्ज घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांच्या नावाने उमेदवारी अर्ज घेतला आहे. तसेच सचिन दोडके यांच्याही नावाने अर्ज घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Ajit pawar news
Uddhav Thackeray : मशालीने हुकूमशाही भस्म करायची; मशाल गीत लाँच केल्यानंतर उद्धव ठाकरेंकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

उमेदवारी अर्ज दाखल करताना पक्षाकडून खबरदारी घेण्यात येते. उमेदवारांचा अर्ज निवडणूक विभागाकडून बारकाईने तपासला जातो. एकापेक्षा अधिक अर्ज दाखल केले जातात. मुख्य उमेदवाराकडून अर्ज दाखल केल्यानंतर पक्ष किंवा उमेदवार पर्यायी उमेदवारी म्हणून अन्य व्यक्तींकडून अर्ज दाखल करण्यास सांगितलं जातं. त्याचप्रमाणे बारातमी लोकसभा मतदारसंघातूनही पर्यायी उमेदवार म्हणून इतरांच्या नावाने अर्ज घेण्यात आले आहेत.

शक्तिप्रदर्शनाची तयारी

बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ही १९ एप्रिल आहे. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात १८ एप्रिलला सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्याकडून निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात येणार आहे. यावेळी दोन्ही दिग्गज उमेदवार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com