State Election Commission Announces Dates for 29 Municipal Corporation Elections Saam
महाराष्ट्र

महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज भरावा लागणार, माघार कधीपर्यंत घेता येणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या

Maharashtra Municipal Corporation Elections: राज्यातील मुंबई पुण्यासह २९ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला मतमोजणी होईल.

Bhagyashree Kamble

राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका झाल्यानंतर आता महापालिका निवडणुकांबाबतही घोषणा करण्यात आली आहे. मुंबई पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा करण्यात आली. राज्य निवडणूक आयोगानं आज सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मतदान आणि मतमोजणीची तारीख घोषित केली. राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली. महापालिका निवडणुकांची मतदान प्रक्रिया १५ जानेवारीला, तर १६ जानेवारीला मतमोजणी होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याबाबत (नामनिर्देशन पत्र) निवडणूक आयोगानं महत्वाची माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांनी नामनिर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५ पर्यंत असेल, असं त्यांनी सांगितलं. तर, नामनिर्देशन पत्रांची छाननी ३१ डिसेंबर २०२५ रोजी होईल, अशी माहिती समोर आली आहे. उमेदवारी माघारीची मुदत २ जानेवारीपर्यंत असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत, राजकीय पक्षांची यासंदर्भात बैठक झाली असल्याची माहिती दिली. त्यात यासंदर्भात मागणी करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. जातवैधता पडताळणी, राखीवसाठी जात वैधता आणि जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्यासाठी सदर अर्जाची सत्यप्रत किंवा अन्य पुरावा दिला तरी स्वीकारला जाईल, अशी माहितीही दिनेश वाघमारे यांनी दिली. सहा महिन्याच्या आत सादर करणे गरजेचं आहे. सादर न केल्यास उमेदवाराची निवड रद्द होईल, असंही दिनेश वाघमारे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Sharma Viral Post: रोहित शर्मा मोठी घोषणा करणार; 'त्या' एका पोस्टने उडाली खळबळ, आभाळाऐवढी उत्सुकता

Horoscope: जीवनात येणार नवं प्रेम; ४ राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा; खर्चावर ठेवा नियंत्रण

मी अजितदादांसोबत बारामतीला जाणार, एअर होस्टेस पिंकी माळीचे वडिलांसोबतचे शेवटचे शब्द

अजित पवारांचा अपघात कसा झाला? ब्लॅक बॉक्स सापडला, गूढ उकलणार?

दादांचा पायलट दोन वेळा निलंबीत, 2 वेळा दारू पिऊन उडवलं विमान

SCROLL FOR NEXT