

थंडी वाढली की आरोग्याच्या निगडीत समस्याही छळतात. पायांचा त्रासही वाढतो. हिवाळ्यात पायांची बोटे लाल होतात. क्रॅम्प येतात. ही समस्या सामान्य आहेत. हवामान प्रचंड थंड झाल्यानंतर रक्तवाहिन्या आंकुचन पावतात. यामुळे स्नायूंवर ताण येतो. या कारणामुळे नसा सुजतात. फक्त थंडी नसून जर वारंवार या समस्या त्रासदायक ठरत असतील तर, ही कदाचित कर्करोगाची लक्षणे असू शकतात.
लिम्फोमा, बोन कॅन्सर, सॉफ्ट टिश्यू सारकोमा, ल्यूकीमिया, प्रोस्टेट कॅन्सर, ओवरी कॅन्सर या कारणांमुळे पायात मोठे बदल दिसून येऊ शकतात. पीएमसी नॅशनल लायब्ररीच्या मते, हे बदल नसांवर दबाव, रक्त प्रवाहात अडथळा किंवा हाडांच्या नुकसानामुळे होऊ शकतात. ही लक्षणे हळूहळू विकसित होतात. तसेच सामान्य समस्यांसारखी वाटतात. म्हणून लोक त्याकडे सहसा दुर्लक्ष करतात. त्यामुळे समस्या वाढण्याआधी पायांची ही लक्षणे समजून घेणे आणि वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचं आहे.
पायांच्या 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
कारण नसताना पायात सूज राहणे
एक किंवा दोन्ही पायांमध्ये सूज राहणे. ही सूज कायम राहिली तर, लिम्फोमा, ओव्हरी कॅन्सर किंवा पेल्विक भागातील ट्यूमरचे लक्षण असू शकते.
सतत पायांना त्रास
पायांमध्ये सतत वेदना होणे ही हाडांच्या कर्करोगाचे किंवा शरीरातील इतर भागातून हाडांमध्ये पसरलेल्या कॅन्सरचे संकेत असू शकतात. चालताना, विश्रांती घेतानाही त्रास कमी होत नसेल तर, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
मुंग्या येणे
पाठीचा कणा, पेल्विस किंवा पोटाचा कॅन्सर काही वेळा पायांवर नियंत्रण ठेवणाऱ्या नसांवर दाब निर्माण करतात. यामुळे पायांमध्ये मुंग्या, चालताना त्रास, तोल जाणे, अचानक कमजोरी अशी लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे कालांतराने वाढत जातात. पायांत गोळे येणे, जडपणा किंवा चालण्यात अडचण यांसारखे समस्याही निर्माण होतात.
वाढत जाणारी गाठ
सॉफ्ट टिश्यू सारकोमा हा कर्करोग प्रामुख्याने मांडी, पिंडरी किंवा नितंबाच्या भागात वेदनारहित गाठीच्या स्वरूपात दिसून येते. या गाठी हळूहळू वाढतात. गाठी आकाराने वाढत असतील तर, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.