vijay wadettiwar saam tv
महाराष्ट्र

Vijay Wadettiwar: सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं, त्यांच्यावरील कारवाईला विलंब झाला - वडेट्टीवार

ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यावर कारवाईसाठी आमच्या सरकारचा विलंब झाला, असंही ते म्हणाले.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर: वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती, असं राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाईसाठी खरं तर आमच्या सरकारला विलंब झाला, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. (ST Workers Protest Vijay Wadettiwar says we delayed taking action against Advocate Gunaratna Sadavarte).

"ॲडव्होकेट सदावर्ते (Gunratan Sadavarte) यांच्यावर यापूर्वीच कारवाई व्हायला हवी होती. सदावर्ते यांच्यावर कारवाईसाठी आमच्या सरकारचा विलंब झाला. गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवलं आहे. सदावर्ते यांच्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचं (ST Workers) नुकसान झालं आहे. सदावर्ते यांच्यावर झालेली कारवाई सौम्य आहे, अधिक कडक कारवाई व्हायला हवी", असं विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

तसेच, यामागे कोणाचा कट आहे, हा तपासाचा भाग आहे असंही ते म्हणाले. याप्रकरणात पोलीस चुकले आहेत. याबाबत गृह विभागाकडून चौकशी व्हावी, दोषींवर कारवाई होईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

शरद पवारांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर काल एसटी आंदोलकांनी (ST Protest) हल्ला केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेकही केली, चपलाही फेकल्या. यावेळी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT