Sachin Kharat
Sachin KharatSaam Tv

Sharad Pawar: पवारांच्या घरावरील हल्ल्याची तातडीने CID चौकशी करा, आरोपींना अटक करा - सचिन खरात

शरद पवार यांच्या घरावर जशा रीतीने हल्ला झाला, हे लोकशाहीमध्ये योग्य नाही.
Published on

पुणे: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याची तातडीने सीआयडी चौकशी करावी. तसेच, गुन्हा दाखल करुन आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केलीये (Sachin Kharat asked for CID investigation of attack on Sharad Pawar's house).

Sachin Kharat
पोलीस माहिती घेण्यास कमी पडले हे निर्विवाद सत्य - अजित पवार

महाराष्ट्र राज्य रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे राज्य आहे. या विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. परंतु, आज शरद पवार यांच्या घरावर जशा रीतीने हल्ला झाला, हे लोकशाहीमध्ये योग्य नाही. कोणाच्या चिथावणीखोर भाषणाने हा हल्ला केला, याची सीआयडी चौकशी करुन कठोर कारवाई करावी. या आरोपींवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात (Sachin Kharat) यांनी केलीये.

शरद पवारांच्या घरावर आंदोलकांचा हल्ला

शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावर काल एसटी आंदोलकांनी (ST Protest) हल्ला केला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. आंदोलकांनी शरद पवारांच्या घरावर दगडफेकही केली, चपलाही फेकल्या. यावेळी आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे पोहोचला. त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com