Latur Bus Stop दीपक क्षीरसागर
महाराष्ट्र

लातुरात एसटी फेऱ्या वाढणार; आठवड्यात ३०० संपकरी कामगार परतले

२२ एप्रिलनंतर या बसेसची संख्या आणखी वाढणार आहे.

दीपक क्षीरसागर

एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या प्रमुख महिन्यांपासून एसटीच्या कामगारांनी संपाचे हत्यार उपसले होते. दरम्यान, न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामगारांना कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. गत आठवडाभरात लातुर जिल्ह्यात तब्बल ३०० संपकरी कामगार कामावर परतले आहेत. टप्प्याटप्प्याने एप्रिलअखेर पर्यंत ही संख्या वाढणार आहे.

सध्या लालपरीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. गत साडेपाच महिन्यांपासून कामगार संपावर गेल्याने एसटीची प्रवासीसेवा कोलमडली होती. यातून प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड झाली आहे. सध्या ३० ते ३५ टक्के बसेस रस्त्यावर धावत आहेत. गत आठवड्यात मोठ्या प्रमाणावर संपातील कामगार कामावर परतल्याने लालपरींची संख्या १६० वर पोहोचली आहे. २२ एप्रिलनंतर या बसेसची संख्या आणखी वाढणार आहे.

हे देखील पहा -

गत साडेपाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवले होते. परिणामी, बसेस आगारातच थांबून होत्या. आता न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कामगारांना कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. परिणामी, टप्प्याटप्प्याने कामगार कामावर परतू लागले आहेत. लातूर जिल्ह्यातील पाच आगारांत जवळपास ४९० बसेस आहेत. या बसेसच्या जवळपास दीड ते दोन हजार फेऱ्या होत असत. मात्र, संपाने सेवा ठप्प झाली. आता बसेस सुसाट आहेत.

१६० बसेस रत्यावर असल्याने ३०० फेऱ्या होत आहेत. येणाऱ्या आठवड्यात फेऱ्यांची संख्या वाढणार आहे. लातूर जिल्ह्यातील लातूर, अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा या पाच आगारांतून सद्य:स्थितीत १६० बसेस सुरु आहेत. आणखी साडेतीनशे बसेस थांबलेल्याच आहेत. अशी माहिती विभागीय नियंत्रक सचिन क्षीरसागर यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ६० वर्षानंतर PFच्या नियमात मोठे बदल

Maharashtra News Live Update: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ४ आरोपींना दिलासा

Singer Trolled for Live Performance: प्रसिद्ध गायिकेचे लाईव्ह कॉन्सर्टवेळी अश्लील चाळे; स्टेजवरील कृत्याने चाहते संतापले, VIDEO

Success Story: आर्थिक परिस्थिती बेताची, अडचणींवर मात करत केली MPSC क्रॅक; सोलापूरच्या शेतकऱ्याची लेक झाली सरकारी अधिकारी

Accident News : राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा थरार, भरधाव ट्रकची रिक्षाला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT