एसटी कर्मचाऱ्यांनी पावत्यांची होळी करून दिला संघटनेचा राजीनामा जयेश गावंडे
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांनी पावत्यांची होळी करून दिला संघटनेचा राजीनामा

कर्मचारी संघटना राज्य सरकारशी भांडू शकत नसल्याच्या कारणावरून, आंदोलनात 34 कर्मचाऱ्यांनी विविध संघटनेचे राजीनामे दिले आहेत.

जयेश गावंडे

अकोला : एसटी कर्मचाऱ्यांनी आज कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या पावत्यांची होळी करीत संघटनेच्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा प्रकार आगार क्रमांक एक येथे कर्मचाऱ्यांनी केला आहे. कर्मचारी संघटना राज्य सरकारशी भांडू शकत नसल्याच्या कारणावरून त्यांनी संघटनेच्या विरोधात रोष व्यक्त करीत हा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी सिटी कोतवाली पोलिसांनी कर्मचाऱ्यांना होळी करण्यापासून मज्जाव केला. यावेळी कर्मचारी आणि पोलिस यांच्यात शाब्दिक वाद झाला.

हे देखील पहा :

त्यानंतर छोट्या स्वरूपात कर्मचाऱ्यांनी कागदाची होळी केली. या आंदोलनात 34 कर्मचाऱ्यांनी विविध संघटनेचे राजीनामे दिले आहे. राज्यातील एसटी कर्मचारी संघटना गेल्या महिन्याभरापासून कर्मचाऱ्यांच्या लढ्यात सहभागी झाल्या नाही. या संघटना कर्मचाऱ्यांच्या असताना त्यांना या आंदोलनात वाऱ्यावर सोडले आहे. यामुळे आगार क्रमांक एक येथे एसटी कर्मचाऱ्यांनी विविध संघटनांचे राजीनामे देऊन त्यांच्या पावत्यांची होळी केली.

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या होळी आंदोलनापूर्वी सिटी कोतवाली पोलिसांनी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन उधळून लावले. होळी साठी आणलेली लाकडे पोलिसांनी उचलून बाहेर फेकली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यांची पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर मात्र कर्मचाऱ्यांनी नियोजित स्थळी छोट्या स्वरूपात आंदोलन केले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी

Puri Recipe: Oil Free पुऱ्या खा, 'ही' रेसिपी लगेचच करा नोट

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

Maghi Ganpati 2026: माघी गणपती जयंती का साजरी करतात? जाणून घ्या पौराणिक कथा

Badlapur : बदलापूरमध्ये इर्शाळवाडी दुर्घटनेची पुनरावृत्ती होणार? वाचा, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT