भंडारा : उपसरपंचाच्या घरी चोर गेले चोरीला; मात्र, डाव फसला!

चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एक चोर पळताना ठेच लागून जमिनीवर पडला. याच दरम्यान शिताफीने उपसरपंच गोपाल परशुरामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमिनीवर पडलेल्या चोरास पकडून चांगलाच चोप दिला.
भंडारा : उपसरपंचाच्या घरी चोर गेले चोरीला; मात्र, डाव फसला!
भंडारा : उपसरपंचाच्या घरी चोर गेले चोरीला; मात्र, डाव फसला! Saam tv
Published On

भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी या गावात एकाच रात्री चार ठिकाणी घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे. दरम्यान, पिंपळगाव कोहळीचे उपसरपंच गोपाल परशुरामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाडसाने चोरांचा पाठलाग करून एकाला पकडण्यास यश आले असून त्यास लाखांदूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अन्य तीन चोर फरार झाले आहेत.

लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोहळी येथे चार अज्ञात चोरांनी सर्वप्रथम गावातील ईश्वर मडकाम यांच्या घरातून आठ सोन्याचे मनी चोरले. त्यानंतर खेमराज गहाणे यांच्या घरात घरफोडीच्या उद्देशाने घुसले. मात्र, संपुर्ण माहिती व परिस्थिती जाणून घेतल्यावर घरात एजास्त लोक असल्याचा अंदाज आल्यावर खेमराज यांच्या घराशेजारील गोवर्धन गहाणे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश केला.

हे देखील पहा :

घरातील प्रत्येक खोल्यामधील साहित्याची नासधूस चोरांनी केली. बेडरूम मधील आलमारीमधून अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच 20 हजार रुपये रोख रक्कम या चोरट्यांनी लांबविली. गोवर्धन गहाणे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना ही चोरी करण्यात आली आहे.

यानंतर चोरट्यांचा मोर्चा पिंपळगाव कोहळीचे उपसरपंच गोपाल पाटील परशुरामकर यांच्या घराकडे वळला. उपसरपंचाच्या घराचा मागील दरवाजा तोडताना आवाज झाल्याने प्रथम गोपाल परशुरामकर यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी वेळीच उठून पाहिले असता चार अनोळखी लोक त्यांना दरवाज्याला छेडछाड करताना दिसून आल्याने त्यांनी पतीला आवाज दिला. तात्काळ उपसरपंच गोपाल परशुरामकर यांनी घराच्या मागे जाऊन बघितले असता चार चोर त्यांना घरामागून पळताना दिसले.

भंडारा : उपसरपंचाच्या घरी चोर गेले चोरीला; मात्र, डाव फसला!
महिलेच्या अंगाला दगड बांधून खाडीत फेकले! विरारमधील घटना
भंडारा : उपसरपंचाच्या घरी चोर गेले चोरीला; मात्र, डाव फसला!
औरंगाबादमध्ये स्क्वॅश खेळाच्या कोचला पळवून-पळवून चपलेने मारहाण! पहा Video

त्यांनी दिनेश परशुरामकर व देवाजी परशुरामकर यांच्यासोबत एक किलोमीटर पर्यंत या चोरट्यांचा पाठलाग केला. यावेळी चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एक चोर पळताना ठेच लागून जमिनीवर पडला. याच दरम्यान शिताफीने उपसरपंच गोपाल परशुरामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जमिनीवर पडलेल्या चोरास पकडून चांगलाच चोप दिला. यावेळी सदर चोराकडून प्रतिकार करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यास पकडण्यास अखेर यश आले. यावेळी आरडाओरड झाल्याने गावातील अनेक लोक घटनास्थळावर उपस्थित झाले होते.

घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी पोहचत या दरम्यान उपसरपंच गोपाल परशुरामकर यांच्या धाडसाने पकडण्यात आलेल्या चोराला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. उपसरपंच गोपाल पाटील परशुरामकर यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यावेळी झटापटीत चोराच्या डोक्याला मार लागल्याने पोलिसांनी त्यास लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. लाखांदूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com