saam TV News Marathi Passengers Risk Lives as Drunk Driver Operates Maharashtra ST Bus
महाराष्ट्र

संतापजनक! पंढरपूरहून निघालेली एसटी बस दारूच्या नशेत चालवली, ३७ जणांचा जीव धोक्यात, चालक अन् वाहकावर कारवाई

ST bus driver and conductor found drunk : दारूच्या नशेत बस चालवत असल्याचा प्रकार अकोला जिल्ह्यात उघड. पंढरपूरहून निघालेल्या बसमध्ये चालक-वाहक नशेत; ३७ प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता.

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Pandharpur Akola ST Bus : दारूच्या नशेत एसटी चालवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पंढरपूरवरून अकोटकडे निघालेल्या बसमधील चालक आणि वाहक दोघेही दारूच्या नशेत असल्याचा प्रकार समोर आलाय. चालक आणि वाहकामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात गेल्याची संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. प्रवाशांची परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे.

पंढरपूरहून अकोला जिल्ह्यातील अकोटकडे निघालेल्या एसटी बसमधील चालक व वाहकाने दारूच्या नशेत बस चालवल्याची गंभीर घडली. या प्रकारामुळे 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. संतप्त प्रवाशांच्या तक्रारीनंतर बीड पोलीस व एसटी प्रशासनाने दोघांना ताब्यात घेतले आहे. दोघांवरही निलंबनाची प्रक्रिया सुरू आहे.

अकोट आगाराची एमएच-१४- ६१४० क्रमांकाची बस पंढरपूरहून अकोटकडे प्रवास करत होती. चालक संतोष रहाटे व वाहक संतोष झालटे हे बस चालवत होते. दरम्यान, बीड ते अकोला जिल्ह्याच्या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातील एसटी अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी संबंधित चालक व वाहकाला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांच्याकडून दारू सेवनाची कबुली मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेचा अहवाल अकोला परिवहन अकोला विभागाला पाठवण्यात येणार आहे. या अहवालानंतर दोघांवर तात्काळ निलंबनाची कारवाई होणार आहे. वैद्यकीय अहवालात दारूचे सेवन सिद्ध झाल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. अशी माहिती मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime News: फसवणूक प्रकरण: कल्याणमधील डॉक्टर बंटी बबलीला न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Manoj Jarange Patil: आखण्यात आला होता जिवे मारण्याचा कट, तरीही मनोज जरांगेंनी नाकारलं पोलीस संरक्षण; काय आहे कारण?

Aadhaar Card Update: आधार कार्डमध्ये येईल QR कोड; काही सेकंदात होतील बँकेची कामे

Sangli Accident : अपघाताचा थरार, भरधाव ऊसाच्या ट्रॅक्टरची धडक; ST बस ओढापत्रात कोसळली

निवडणूक आयुक्त अमित शाहांचे पाया पडले? नेमके प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT