ST bus NCMC card deadline extended Saam Tv
महाराष्ट्र

ST Bus: एसटी प्रवाशांना मोठा दिलासा, NCMC कार्डला अखेर मुदतवाढ; अखेरची तारीख काय?

ST bus NCMC Card Deadline Extended: गणेशोत्सवात सरकारने एसटी प्रवाशांना मोठा दिलासा दिला. NCMC कार्डला अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना दिलासा मिळाला.

Priya More
  • एसटी प्रवाशांना मोठा दिलासा

  • एनसीएमसी कार्डला अखेर मुदतवा

  • एनसीएमसी कार्डची अंतिम तारीख ३० सप्टेंबर

  • महिला प्रवाशांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांना मुदतवाढीमुळे मिळाला दिलासा

एसटी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' १ सप्टेंबर २०२६ पासून अनिवार्य केलं होतं. मात्र आता या योजनेला सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली आहे. आता कार्डची सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र सरकारकडून १ सप्टेंबर २०२६ पासून शासनाच्या सवलतीचा लाभ घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र एनसीएमसी कार्ड घेताना अनेक प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याबाबत एसटी महामंडळाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला. एसटी बस प्रवासासाठी लागणाऱ्या एनसीएमसी कार्ड योजनेला सरकारने मुदतवाढ दिली.

एसटी महामंडळाच्या बसमधून शासनाने दिलेल्या सवलतीत प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी आणि ज्यांचे वय ६५ ते ७५ वर्षे आहे अशा ज्येष्ठ नागरिकांना सवलतीचे तिकीट यापुढे एनसीएमसी कार्डद्वारे देण्यात येत आहे. पण या कार्ड प्रणालीच्या सर्व्हरवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे प्रवासादरम्यान सवलतीचे तिकीट देताना अनेक अडचणी येत आहेत. प्रवाशांना हे कार्ड घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहेत. त्यामुळे आता एसटी महामंडळाने प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला.

आता ३० सप्टेंबरपर्यंत पूर्वीच्या सवलतीचे तिकीट देण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्यांचे एनसीएमसी कार्ड आधीच सक्रीय झाले आहे त्यांनी कार्डद्वारेच सवलतीचा लाभ घ्यावा असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबतच्या सूचना सर्व आगारांना देण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाशांकडे एनसीएमसी कार्ड आहे त्यांना सवलतीचे तिकीट एनसीएमसी कार्डमधूनच देणे बंधनकारक करण्यात आले आहे. कार्ड रीड न होणे आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे कार्डद्वारे तिकीट देणे शक्य न झाल्यास पूर्वीच्या पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्यास देखील सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माझ्या नादाला लागू नको! राष्ट्रवादीच्या आमदाराचा पक्ष प्रवक्त्याला इशारा; अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर

School Timing: कोकणातील 'या' जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत होणार बदल? शिक्षणमंत्र्यांना माजी आमदाराचं पत्र

टीम इंडियाला मिळाला नवा कर्णधार! स्मृती मंधानाकडं महिला क्रिकेट संघाचं नेतृत्व

Pitru Paksha Tv - Mobile Shopping: पितृपक्षात नवीन टिव्ही, मोबाईल फोन खरेदी करावा की नाही?

Ind vs NZ T20 Series : भारतीय संघाची घोषणा; 'पब्लिक डीमांड' खेळाडूचं 4 वर्षांनी जोरदार कमबॅक, पण महारथी संघाबाहेर

SCROLL FOR NEXT