महाराष्ट्रात पावसानं दडी मारून महिना उलटल्यामुळे दुष्काळाचं संकट आणखी गडद झालंय. राज्यातील विविध जिल्ह्यांमधल्या सुमारे 86 तालुक्यांत दुष्काळसदृश स्थिती असून शेतकऱ्यांसमोर संकट ओढावलंय. 86 तालुक्यात तब्बल 20 दिवसांहून अधिक काळ पावसाचा एकही थेंब पडलेला नाहीये. तर 27 तालुक्यांत दीड महिन्यापासून पावसानं अक्षरशः पाठ फिरवलीये. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीये. त्यासाठी शेतकऱ्यांनी लातूर-जहीराबाद महामार्ग रोखलाय...
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीये. खामगावमध्ये संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलंय. एव्हंढच नव्हे तर संतप्त शेतकऱ्यांनीही आमरण उपोषण सुरू केलंय...
दुसरीकडे राज्यावरील दुष्काळाचं संकट तीव्र होत असताना राज्य मंत्रिमंडळात यावर चर्चा करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांनी थेट आराखडा तयार करण्याचे आदेश दिलेत...
दरम्यान, राज्यातील कोण-कोणत्या तालुक्यांना दुष्काळाच्या झळा बसल्यात तेही पाहूयात...
अर्धा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त
उत्तर महाराष्ट्र (31)
जळगाव - 13
अहिल्यानगर - 9
नाशिक - 7
धुळे - 2
अर्धा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त
विदर्भ (22)
बुलढाणा - 8
अकोला - 4
अमरावती - 4
वाशीम - 3
वर्धा - 1
यवतमाळ - 1
नागपूर - 1
अर्धा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त
पश्चिम महाराष्ट्र (17)
पुणे - 5
सोलापूर - 5
सातारा - 4
सांगली - 3
अर्धा महाराष्ट्र दुष्काळग्रस्त
मराठवाडा (16)
बीड - 6
संभाजीनगर - 4
धाराशिव - 3
परभणी - 2
जालना - 1
खरंतर, खरीप हंगामातील सोयाबीन, मका, ज्वारी, कापूस, बाजरी आणि इतर कड धान्यांची पिके जवळपास बळीराजाच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाईची आशा आहे. आधीच सरकारनं दुष्काळी परिस्थितीचं सर्वेक्षण करणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यातच आता पुन्हा दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यात आलाय. त्यामुळे पुढील दिवसांत सरकार कोरडा दुष्काळ जाहीर करणार का?... आणि आवश्यक उपाययोजनांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का?... याकडे सगळयांचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.