SSC Result 2026 saam Tv
महाराष्ट्र

SSC Result 2026: दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला, पाहा मुंबई पुण्यासह ९ विभागाचा किती टक्के निकाल?

SSC Result 2026 Announced Check Online: दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. यावेळीदेखील कोकण विभागाने बाजी मारली आहे. दरम्यान, तुमच्या विभागाचा निकाल किती ते जाणून घ्या.

Siddhi Hande

दहावीचा निकाल जाहीर

सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा

११.३० वाजता वेबसाइटवर पाहता येणार निकाल

दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीचा निकाल जाहीर केला आहे. यंदा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के लागला आहे. सकाळी ११.३० वाजता तुम्हाला निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे. तुम्ही https://mahahsscboard.in/ वेबसाइटवर जाऊन निकाल पाहू शकतात.

दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला (SSC Result 2026 Drop by 2 Percent)

यंदा दहावीच्या निकालात २ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, यंदादेखील मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा मुलींना जास्त गुण मिळाले आहे. ९ विभागांचा निकाल जाहीर झाला आहे. कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणात सर्वाधिक मुले दहावीत पास झाली आहे. याबाबत राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग आणि राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

राज्यात एकूण १५ लाख ५५ हजार ०२६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख २० हजार ४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांचा निकाल ९०.५६ टक्के लागला आहे.

महाराष्ट्रातील ९ विभागांचा निकाल (Maharashtra Board SSC Result 2026 Out)

कोकण:९७.६२ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT