दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. दहावी-बारावीची फेब्रुवारी- मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या परिक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता विद्यार्थी २२ नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरु शकतात. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या निर्णयानुसार ३१ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत नियमित शुल्कासह अर्ज भरता येणार आहे. तर १५ ते २२ नोव्हेंबर या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहेत. त्यामुळे आता २२ नोव्हेंबरपर्यंत तुम्ही अर्ज भरु शकतात. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ करण्यात आल्याने आणखी काही वेळ विद्यार्थ्यांना मिळणार आहे. (HSC And HSC Registration Date)
काही दिवसांपूर्वी दहावी-बारावीच्या वेळापत्रकाबद्दल अफवा सोशल मीडियावर परसवली जात होती. दहावी- बारावीच्या वेळापत्रकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे कोणीही अशाप्रकारे वेळापत्रक जाहीर न केले असल्याची माहिती दिली आहे.त्यामुळे अधिकृत माहिती आल्यानंतरच तुम्ही वेळापत्रकावर विश्वास ठेवा, असं सांगण्यात आलं होतं. (10th And 12th Exam Registration Date Extended)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.