Summer vacations:  शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर
Summer vacations

Summer vacations: शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी; राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर

Summer vacations : पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू होतील.
Published on

(सागर आव्हाड, पुणे)

Secondary And Higher Secondary Schools in State: पुणे: राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांना २ मे पासून सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक काढले आहे. विदर्भ वगळता राज्यातील इतर ठिकाणी पुढील शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू होणार आहे. शिक्षण संचालनालयाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार संपूर्ण राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व शाळांची सन २०२४ ची उन्हाळी सुट्टी आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ सुरू करण्यासंदर्भात सूचना देखील देण्यात आल्यात.

पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू करण्यात येणार आहेत. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारत घेत विदर्भातील शाळाा १ जुलैपासून सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com