Sri lanka car racing  Saam TV
महाराष्ट्र

Sri Lanka Car Racing : श्रीलंकेत कार रेसिंगमध्ये मोठी दुर्घटना; लहान मुलासह ७ जणांचा मृत्यू २३ जखमी

Sri Lanka Car Racing Accident : कार रेसिंग स्पर्धेत अपघात होऊन ७ व्यक्तींचा मृत्यू झालाय. तसेच २३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि धावपळ सुरू झाली.

Ruchika Jadhav

श्रीलंका येथील उवा प्रांतात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका कार रेसिंग स्पर्धेत अपघात होऊन ७ व्यक्तींचा मृत्यू झालाय. तसेच २३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ आणि धावपळ सुरू झाली. या घटनेत कारखाली एक लहान मुलगा देखील चिरडला गेला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवारी २१ एप्रिल रोजी ही दुर्घटना घडली आहे. उवा प्रांत येथे एक कार रेसिंग स्पर्धा सुरू होती. यामध्ये अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धा सुरू झाल्यानंतर एका कारने अचानक आपला ट्रॅक बदलला. त्यानंतर चालकाचे कारवरी नियंत्रण सुटले आणि कार अनियंत्रीत झाली. ट्रॅक बदलून कार थेट प्रेक्षकांमध्ये शिरली.

कार आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून तेथे मोठी पळापळ सुरू झाली. या दुर्घटनेत ७ व्यक्तींचा मृत्यू आणि २० जण जखमी आहेत. यात एका ८ वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह वैद्याकीय सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

१ लाखांहून अधिक व्यक्तींचा सहभाग

साल २०१९ आधी ही स्पर्धा दरवर्षी आयोजित केली जात होती. कोरोनानंतर यंदा श्रीलंकाई सेनाकडून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामुळे ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. ही गर्दी जवळपास १ लाखांहून अधिक व्यक्तींची होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT