Spice Jet Saam Digital
महाराष्ट्र

Pune Airport: दिल्लीहून निघालेलं विमान पुण्याजवळ येताच पुन्हा फिरलं माघारी; प्रवाशांमध्ये उडाला एकच गोंधळ

Spicejet Flight From Delhi To Pune: आज सायंकाळी ५.३० वाजता दिल्ली विमातळावरून पुण्याकडे निघालेलं विमान पुण्याजवळ पोहोचताच पुन्हा माघारी फिरलं. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला होता.

Sandeep Gawade

दिल्ली विमानतळावरून सायंकाळी ५.३० वाजता पुण्याकडे निघालेलं स्पाईस जेट कंपनी चे एस जी 8938 विमान पुण्याजवळ येताच पुन्हा माघारी फिरलं. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला होता. विमान पुन्हा दिल्लीत पोहोचलं त्यामुळे प्रवासी विमानतळावर बराच काळ खोळंबले होते. कंपनीकडून या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नसली तरी पुण्याजवळ येताच रडारमध्ये तांत्रिक अडचण आल्याने विमान पुन्हा दिल्लीकडे फिरवल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, स्पाईस जेट कंपनी चे एस जी 8938 विमानाने सायंकाळी ५.३० वाजता दिल्ली विमानतळावरून पुण्यासाठी उड्डाण भरलं होतं. जवळपास सव्वा दोन तास पुण्यात पोहोचण्यासाठी लागतात. सर्व काही सुरळीत होतं. पुणे विमानतळावर काही क्षणात विमान लँड करणार होते. त्यामुळे प्रवाशी निश्चितं होते. मात्र कोणाच्याही ध्यानीमनी नसताना विमानाने अचानक यु टर्न घेतला आणि पुन्हा दिल्लीच्या दिशेने उड्डाण भरलं.

नेमकं काय घडलं आहे, याबाबत प्रवाशांना काहीही संजलं नाही. विमानाने थेट दिल्ली गाठली आणि विमानतळावर लँड केलं. त्यामुळे प्रवाशांचे जवळपास ५ तास पाया गेलेचं शिवाय विमानात नेमकं काय घडलंय हे कोणच सांगत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. रडारमध्ये तांत्रिक अडचण असल्यामुळे विमान दिल्लीकडे वळवण्यात आल्याचं प्रवाशांनी सांगितलं. कंपनीकडून रिफ्रेशमेंट देण्यात आली असून विमान लवकरच पुण्याकडे उड्डाण भरेल, असं प्रवाशांना सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT