Emergency Landing : विमानात तांत्रिक बिघाडामुळे दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी लँडिंगचा थरार; सर्व प्रवासी सुरक्षित

हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे विमान टेक ऑफ केल्यानंतर परतले.
VIstara Airline
VIstara AirlineSaam TV
Published On

Emergency Landing : दिल्लीहून भुवनेश्वरला जाणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या विमानात सोमवारी संध्याकाळी तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर दिल्ली IGI विमानतळावर संपूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आली. DGCA ने सांगितले की हायड्रोलिक बिघाडामुळे एअर विस्तारा UK-781 फ्लाइटसाठी दिल्ली ते भुवनेश्वरला पूर्ण इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती.

VIstara Airline
Indigo Flight Ruckus : आता इंडिगो विमानात दारूड्या प्रवाशांचा धिंगाणा, नेमकंं काय घडलं?

हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे  विमान टेक ऑफ केल्यानंतर परतले. सायंकाळी 7.53 वाजता ही घटना घडली. फ्लाइट UK-781 ने 8.19 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 140 प्रवासी होते.

VIstara Airline
Air India Case : विमानात महिलेवर लघुशंका करणारा शंकर मिश्रा अखेर अटकेत, बेंगळुरू येथून अटक

डीजीसीएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ करताच विमानाच्या पायलटला विमानातील हायड्रोलिक सिस्टीममध्ये बिघाड झाल्याचे समजले होते. पायलटने एटीसीला याची माहिती दिली, त्यानंतर दिल्ली विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी बोलावून सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com