Shreya Maskar
ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी ओल्या नारळाची किस, साखर, साजूक तूप, सुकामेवा, वेलची पूड, मैदा, गव्हाचे पीठ, मीठ, पाणी , कॉर्नफ्लोर इत्यादी साहित्य लागते.
ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये तूप गरम करू त्यात काजू, मनुका आणि इतर सुकामेवा फ्राय करा आणि काढून घ्या.
त्याच पॅनमध्ये खवलेला ओला नारळ आणि साखर मंद आचेवर शिजवून घ्या. मिश्रण सतत ढवळत रहा. साखरेला चांगले पाणी सुटू द्या.
आता मिश्रणात सुकामेवा आणि वेलची पूड घालून गॅस बंद करा. सारण पूर्णपणे थंड होऊ द्या.
एका मोठ्या परातीत मैदा, गव्हाचे पीठ आणि चवीनुसार मीठ टाकून गरम तुपाचे मोहन घालून कणिक मळून घ्या. थोडे थोडे पाणी टाका. तयाक कणिक १० मिनिटे ओल्या कपड्यांत झाकून ठेवा.
एका छोट्या बाऊलमध्ये कॉर्नफ्लोर आणि साजूक तूप एकत्र चांगले फेटून घ्या. त्याची गुळगुळीत पेस्ट तयार करा.
आता पिठाचे गोळे करून पातळ पोळी लाटून त्यात मध्यभागी ओल्या नारळाचे सारण भरा. कडांना थोडे पाणी लावून करंजी घट्ट बंद करा
शेवटी पॅनमध्ये तेल गरम करून करंज्या खरपूस तळून घ्या. चांगले गोल्डन फ्राय करा. अशाप्रकारे कोकण स्पेशल करंज्या तयार झाल्या आहेत.