Samruddhi Mahamarg Yandex
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावरील अपघात होणार कमी; वाहतूक विभागाचा मास्टरप्लान आला समोर

Rohini Gudaghe

Samruddhi Mahamarg News

समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) सातत्याने होणारे अपघात चिंतेचा विषय आहे. महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत येथे शेकडो अपघात झाले आहेत. समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. महामार्गावरील अपघातांचं प्रमुख कारण वाहनांचा वेग असल्याचं समोर आलं आहे. आता या दृष्टाने प्रशासनाने मोठं पाऊल उचललं आहे.  (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावर आता बेशिस्त वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात येत आहे. महामार्गावर दर दहा किमीवर वाहनांचा वेग मोजणारं यंत्र बसविण्यात येणार आहे (Samruddhi Mahamarg News). मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावर वेगमर्यादा न पाळणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर वाहनांचा वेग मोजणारी यंत्रणा उभारली जात आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समृद्धी महामार्गावर आयटीएमएस

यामुळे आता बेशिस्त वाहनचालकांना चाप बसण्यास मदत मिळणार आहे. भरधाव वाहनांवर दंडात्मक कारवाई करणं शक्य होणार (Speedometers On Samruddhi Mahamarg) आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून यासाठी १ हजार ४९८ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. महामार्गावर इंटिलिजंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टम (आयटीएमएस) बसविण्यात येत आहे. यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.

समृद्धी महामार्गाची लांबी ७०१ किलोमीटर आहे. महामार्गावर फक्त २४ ठिकाणांवरून वाहनांना प्रवेश मिळणार आहे. या मार्गावर प्रतितास १५० किलोमीटर वेगमर्यादा आखून देण्यात आली (Samruddhi Mahamarg Accident) आहे. सद्य:स्थितीत या महामार्गावर प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा आहे. परंतु, त्यापेक्षा अधिक वेगाने वाहने महामार्गावरू जाताना दिसतात. तसंच महामार्गावर लेनची शिस्त पाळली जात नसल्याचं दिसत आहे. यामुळं गंभीर अपघात घडले आहेत.

नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई

बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर वचक बसविण्यासाठी आणि अपघातादरम्यान तत्काळ मदतीसाठी विशेष अशी आयटीएमएस यंत्रणा बसविण्यात येत आहे. आता नियमभंग करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई करता येणार (Samruddhi Mahamarg Latest Update) आहे. पुढील २१ महिन्यांत ही यंत्रणा उभारण्याचं काम पूर्ण केलं जाणार आहे. 'आयटीएमएस प्रणालीसाठी मागविलेली निविदा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे', अशी माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी लोकमतला दिली आहे.

आयटीएमएसची वैशिष्ट्ये

  • • प्रत्येक २० किमी अंतरावर वाहनाचा वेग दाखविणारी यंत्रणा (Intelligent Transport Management System)

  • • महामार्गावर प्रत्येक १०० किमी अंतरावर ट्रॅफिक मॅनेजमेंट केंद्र

  • • प्रत्येक टीएमसीवर २ ड्रोन यंत्रणा आणि हायवे पोलिसांसाठी २ स्पीड गन यंत्रणा

  • • बोगद्यात लेन कंट्रोल सिस्टम.

  • • प्रत्येक एंट्री, एक्झिट आणि बोगद्यांच्या प्रवेशद्वारावर डिजिटल बोर्ड

  • • महामार्गावर मदतीसाठी अत्यावश्यक कॉल बूथ

  • दुर्घटनेवेळी संवादासाठी वायरलेस पद्धतीची मोबाइल रेडिओ कम्युनिकेशन सिस्टम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT