NEET Exam Scam Saam Tv
महाराष्ट्र

NEET Exam Scam : नीट घोटाळ्याची कशी होती मोडस ऑपरेंडी? सावज कसं हेरायचे? इंटरेस्टिंग इनसाइड स्टोरी, VIDEO

NEET घोटाळ्याचं मराठवाड्याचं कनेक्शन समोर आल्यावर आता तपासात धक्कादायक बाबी समोर येतायेत. संशयीत शिक्षकांची मोडस ऑपरेंडी समोर आली आहे. कशा प्रकारे लातूरमधून नीट परीक्षेचा गोरखधंदा चालायचा त्यावर साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट.

Girish Nikam

नीट पेपरफुटीचं जाळं थेट महाराष्ट्रापर्यंत पसरल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलय. तपासात नीट गैरव्यवहाराचा लातूर पॅटर्न उघड झाला आहे. एटीएस आणि लातूर पोलिसांनी याप्रकरणी आता तपासाची चक्र वेगानं फिरवण्यास सुरुवात केली आहे.

अटक झालेल्या आरोपींकडून 'नीट'च्या 12 विद्यार्थ्यांचे हॉलतिकीट आणि 6 मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान आरोपी संजय जाधवला लातूर जिल्हा सत्र न्यायालयाने 6 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

घोटाळ्याच्या रॅकेटमध्ये कोणाकोणाचा समावेश आहे?

  • जलील पठाण, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, लातुर

  • संजय जाधव, जि. प. शिक्षक, माढा

  • इरान्ना कोनगलवार, आयटीआय सुपरवायझर, उमरगा

  • गंगाधर मुंडे - दिल्लीतील एजेंट

NEET घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी

- जलील पठाण विद्यार्थ्यांना हेरुन गुण वाढवण्याचे आमिष दाखवायचा.

- त्यासाठी 5 लाख रुपये रेट होता.

- 50 हजार अॅडव्हान्स घ्यायचा.

- हॉल तिकीट संजय जाधवकडे पाठवायचा.

- संजय जाधव 2 मोबाईलवरून विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे, अॅडव्हान्स पैसे जमा करून उमरग्याच्या इरान्ना कोनगलवारकडे पाठवून द्यायचा.

- इरान्ना जाधव डेटा आणि पैसे दिल्लीत सुत्रधार गंगाधर मुंडे याच्याकडे पाठवायचा. गुणवाढ होईपर्यंत पाठपुरावा करायचा.

- ज्या मुलांचे पैसे मिळालेत त्यांचे नीट परीक्षेत गुण वाढवणे, त्यांना आधी प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देणे ही कामे गंगाधर मुंडे करायचा

गेल्या दोन वर्षांपासून लातूर ते दिल्ली हे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती तपासात समोर आली. मुख्य सूत्रधार गंगाधर मुंडेच्या शोधासाठी एटीएसचे पथक दिल्लीकडे रवाना झाले आहे. संशयीत शिक्षकांकडे ज्या 12 विद्यार्थ्यांची हॉलतिकिटे सापडली आहेत त्यांच्या पालकांचीही पोलिस चौकशी सुरु झाली आहे. जप्त केलेल्या मोबाईलमध्ये काही सांकेतिक भाषेत मेसेज आहेत, ते तपासण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी इतर परीक्षांबाबतही गैरव्यवहार केल्याचा संशय आहे.

इतर स्पर्धा परीक्षांमध्येही आरोपींकडून गैरव्यवहार होत आहेत. गेल्या 2 वर्षातीत भरती घोटाळ्यांमध्ये समावेशाचा संशय आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका, महापालिका भरती घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय आहे. विविध स्पर्धा परीक्षांचे 5 ते 6 हॉल तिकीट सापडलेत. पैशाच्या मोबदल्यात मोठा गैरव्यवहार केल्याची शक्यता आहे.

शिक्षणाची पंढरी म्हणून नावारुपास आलेल्या लातुरमध्ये परीक्षांचे गैरव्यवहार समोर आल्यानं गुणवंत विद्यार्थ्यांसह पालक वर्गाला धक्का बसला आहे. शिक्षण क्षेत्राला लागलेली ही भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट होण्याची गरज आहे. अन्यथा प्रचंड मेहनत करून परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांवरचा अन्याय दूर होणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

Shocking : सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने विहिरीत उडी मारून संपवलं आयुष्य; कोल्हापुरात खळबळ

Hotel Kitchen Food : धक्कादायक! तुमच्या जेवणात कचरा ? व्हिडिओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल | VIDEO

Ramayana: जगातील सर्वात भव्य महाकाव्यांचा आरंभ 'रामायण'; अभिनेता रणबीर कपूरची मोठी भूमिका

Bhoj Dam : भोज धरणावर मस्ती भोवली; पर्यटक पाण्याच्या प्रवाहात अडकला, सुदैवाने वाचला जीव

SCROLL FOR NEXT