Special Report Saam Digital
महाराष्ट्र

Special Report : ठाकरेंचे 2 खासदार शिंदेच्या संपर्कात?; शिंदेंचा ठाकरेंना पुन्हा दणका?

Maharashtra Politics 2024/Shiv Sena : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार असं दिसतंय. कारण शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केलाय. ठाकरेंचे 2 खासदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हस्केंनी म्हंटलंय.

Sandeep Gawade

तन्मय टिल्लू, साम टीव्ही प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा फोडाफोडीचं राजकारण रंगणार असं दिसतंय. कारण शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी मोठा दावा केलाय. ठाकरेंचे 2 खासदार आपल्या संपर्कात असल्याचं म्हस्केंनी म्हंटलंय. मात्र यावरून ठाकरे गटही आक्रमक झालाय. पाहूयात यावरचाच हा रिपोर्ट

लोकसभा निकालात राज्यानं मविआला सर्वाधिक जागा दिल्या. त्यातही ठाकरे गटाचे एकूण 9 खासदार निवडून आलेत.आता मात्र ठाकरे गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. निवडून आलेल्या 9 खासदारांपैकी 2 खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा ठाण्याचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्केंनी केलाय. अपात्रता टाळण्यासाठी प्लॅनही तयार असल्याचा दावा म्हस्केंनी केल्यानं ठाकरे गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे.

20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील ऐतिहासिक बंड केलं. त्यावेळी शिंदेंसोबत 12 खासदार होते. 20 जून रोजी राज्यात एकीकडे विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडल्या..तर दुसरीकडे त्याच रात्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. विधानसभेतून शिंदे ठाणे व्हाया सुरुत मार्गे गुवाहटीत पोहचले होते. त्यानंतरही गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये एकनाथ शिंदेंनी एक-एक करुन ठाकरे गटाचे नेते आमदार आपल्या गळाला लावले.आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ठाकरे गटातील या गळतीला चाप बसेल, असा अंदाज होता. मात्र म्हस्केंच्या विधानानं राजकीय वर्तुळात पुन्हा चलबिचल सुरू झालीय.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेनं लोकसभा निवडणुकीत 9 खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप आपला करिष्मा कायम असल्याचं दाखवलं. आता खासदार नरेश म्हस्केंच्या दाव्यावर ठाकरे गटानेही आक्रमक पवित्रा घेतलाय.

कोण जाणार ? कोण राहणार?

दक्षिण मुंबई - अरविंद सावंत

दक्षिण मध्य मुंबई - अनिल देसाई

मुंबई ईशान्य - संजय दिना पाटील

शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे

यवतमाळ-वाशिम संजय देशमुख

हिंगोली नागेश आष्टीकर

नाशिक राजाभाऊ वाजे

हातकणंगले धैर्यशील माने

धाराशिव ओमराजे निंबाळकर

शिवसेना ठाकरे गटाने 21 जागा लढवल्या होत्या. त्यापैकी 9 जागांवर त्यांना विजय मिळाला. आता शिंदे गटाच्या दाव्यानं पुन्हा काही खासदार ठाकरेंची साथ सोडणार का असा सवाल उपस्थित झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Government: शेतकऱ्यांच्या विदेश अभ्यास दौऱ्याच्या अनुदानात मोठी वाढ; कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर; माजी IPS आणि प्रसिद्ध गायिकेसहित कुणाला मिळाली संधी?

Hema Malini Birthday: हेमा मालिनी यांनी चित्रपटात काम करण्यासाठी नाव का बदललं? जाणून घ्या कारण

Men's health checkup: वयाच्या पन्नाशीनंतर पुरुषांनी 'या' चाचण्या करूनच घ्याव्यात; या गोष्टींवर लक्ष ठेवा

Maharashtra Live News Update: पालघर - बोईसर तारापूर एमआयडीसीत वायुगळती

SCROLL FOR NEXT