Ashadhi Wari 2023 Saam Tv
महाराष्ट्र

Ashadhi Wari 2023: आषाढी एकादशीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विठ्ठल भक्तांना विशेष भेट; 54 अधिकच्या फेऱ्या

Pandharpur wari News: 24 जून ते 3 जुलै पर्यंत रेल्वेच्या 54 अधिकच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.

विजय पाटील

Sangli News: आषाढी एकादशीसाठी मिरज रेल्वे प्रशासनाकडून विठ्ठल भक्तांना विशेष भेट देण्यात आली आहे. आषाढी साठी पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्यांची संख्या पाहता 24 जून ते 3 जुलै पर्यंत रेल्वेच्या 54 अधिकच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत.त्यामुळे आषाढी एकादशीसाठी रेल्वे प्रशासनाकडून विठ्ठल भक्तांना विशेष भेट देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी, भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होत असतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणार एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात.

आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोणातून या दिवसाला खूप महत्त्व आहे. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. यासाठी वारकरी संप्रदाय हे आषाढी वारीला पंढरपूरला जात असतात.

त्यामुळे मिरजेतून (Miraj) आषाढी एकादशी साठी रेल्वे प्रशासनाने 24 जून पासून ते 3 जुलै पर्यंत विशेष आषाढी एकादशी गाड्या सोडल्या आहेत. पंढरपूर (Pandharpur) मिरज पंढरपूर ह्या गाड्यांच्या 10 फेऱ्या अधिक होणार आहेत. मिरज कुर्डुवाडी मिरज या गाड्यांच्या 20 फेऱ्या होणार आहेत. मिरज पंढरपूर मिरज या गाड्यांच्या 20 फेऱ्या होणार आहेत.

तर नागपूर मिरज नागपूर (Nagpur) ह्या गाड्यांच्या 4 फेऱ्या होणार आहेत. या गाड्या दिनांक 23 जून ते 3 जुलै पर्यंत असणार आहेत.आणि फक्त नागपूर मिरज नागपूर ही रेल्वे गाडी 25 जून ते 30 जून पर्यंत धावणार आहे. आषाढी एकादशीला जाणाऱ्या सर्व भाविकांनी, आणि वारकरी भक्तांनी याचा लाभ घ्यावा. असे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत आगीच सत्र सुरूच, भांडूपमधील ड्रिम्स मॅालला आग

Jaggery Vs Sugar In Diabetes: डायबिटीजच्या रूग्णांसाठी गूळ साखरेपेक्षा चांगला आहे का? रक्तातील साखर वाढू नये म्हणून गुळाचे सेवन किती करावे?

Political News: उपमुख्यमंत्र्यांचा घटस्फोट, अनेक वर्षांचा सुखी संसार मोडला; पोस्ट होतेय व्हायरल

Mumbai Fire: मुंबईत अग्नितांडव! फटाक्याच्या दुकानाला भीषण आग, एकाचा होरपळून मृत्यू

Gokul President Election: 'गोकुळ'चा अध्यक्ष कोण होणार? आज होणार स्पष्ट, शशिकांत पाटील की रणजीतसिंह पाटील कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT