Sadabhau Khot Saam Tv
महाराष्ट्र

Sadabhau Khot: शरद पवारांवर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली

Sadabhau Khot On Sharad Pawar : अहमदनगरच नामांतराच्या मुद्द्यावर बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Satish Kengar

मनोज जयस्वाल, साम टीव्ही, प्रतिनिधी

अहमदनगर शहराचे नाव हे अहमदनगरच ठेवावं, यासाठी मुस्लिम बांधवानी शरद पवारांच्या ताफ्या समोर आंदोलन केलं. यावरून रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. मात्र पवार टीका करताना त्यांची जीभ घसरली आहे.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

सदाभाऊ भाऊ खोत यांनी मुस्लिमांना शरद पवारांचे जावई संबोधलंय. माध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत म्हणाले आहेत की, ''हा आंदोलनाचा प्रकार शरद पवारांच्या ताफ्यासमोरच का व्हावा, कारण त्यांना माहिती आहे, आपला सासरा आता आलेला आहे. त्यामुळे जावयांनी तिथे आरोळी दिली की, अहमदनगरच नाव अहमदनगरच ठेवा. मात्र आमची आरोळी आहे. अहिल्यादेवी नगरच नावं ठेवा.''

सदाभाऊ खोत आज वाशिम येथे अतिवृष्टीने झालेलं शेत पिकांचे नुकसान पाहण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

यावेळी बोलताना खोत म्हणाले, ''आंदोलकांना शरद पवार यांनी स्पष्ट म्हणायला हवं होतं की, पुण्यश्लोका अहिल्यादेवी होळकर यांनी खऱ्या अर्थाने देशाला, महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं आहे. हा राज्य, हा देश उभं करण्याचं काम केलं आहे. औद्योगिक किंवा सामाजिक असेल, त्यात त्यांचं मोठं योगदान आहे.''

ते म्हणाले की, ''हिंदुत्वाची पथाका फडकत ठेवण्याचं काम सुभेदार होळकर यांच्यानंतर, ती परंपरा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी चालवलेली होती. मात्र शरद पवार यांनी त्यावर एकही भाष्य केलं नाही. कारण त्यावर जर बोलले तर जावई रुसतील आणि जावई जर रुसले तर विधानसभेत लेकीला घरी पाठवतील. ही भीती शरद पवार यांच्या मनात असेल.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात पावसाचा कहर, ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक बंद

Grah Gochar 2025: चंद्र, मंगळ आणि केतूच्या भेटीनं ३ राशींचे भाग्य उजळणार, नात्यात गोडवा अन् घरात येणार पैसा

Palak Curry Recipe : पालक करी अन् गरमागरम चपाती, रविवारचा हेल्दी बेत

Court Attack : कोर्टावर दहशतवादी हल्ला; 8 जणांचा मृत्यू, परिसरात खळबळ

Ind vs Eng : आधीच ३११ धावांची पिछाडी, त्यात शून्यावर साई-यशस्वी बाद, मँचेस्टरमध्ये टीम इंडियावर पराभवाचं सावट

SCROLL FOR NEXT