SP Neelotpal, Gadchiroli Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : गडचिरोलीच्या जंगलात पोलीस - नक्षलवाद्यांत चकमक, नक्षली ठार; SP Neelotpal यांनी दिली माहिती (पाहा व्हिडीओ)

गडचिरोलीच्या जंगलात चकमक; एक नक्षलवादी ठार

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli Breaking Marathi News : गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कियरकोटी अबुझमाड जंगल परिसरात आज (शनिवार) सकाळी १० वाजता पोलीस- नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका नक्षलवाद्यास ठार करण्यात गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांना यश आले आहे. या कारवाईची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल (SP Neelotpal) यांनी दिली. (Breaking Marathi News)

गडचिरोली पोलीस दलाचे सी-60 जवान भामरागड तालुक्यातील जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. यात पोलीस जवानांनी एका नक्षलवाद्यास ठार केले आहे. त्याचा मृतदेह जवानांच्या हाती लागला आहे.

घटनास्थळावरून दोन बंदूक आणि इतर नक्षल साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. घटनास्थळावर सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

मदतीसाठी गडचिरोली पोलीस मुख्यालयातून हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले असून घटनास्थळ घनदाट जंगलात असल्याने मदतीसाठी विलंब होत असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिमने मुंबईत बॉम्बस्फोट केला नाही, तो दहशतवादी नाही, ममता कुलकर्णीचा धक्कादायक दावा

Maharashtra Live News Update: नंदुरबारमध्ये हवामान खात्याचा येलो अलर्ट

Mahima Chaudhary Wedding: 52 व्या वर्षी बोहल्यावर चढणार महिमा चौधरी? कोण आहे तिचा नवरा? जाणून घ्या

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! लाडकीच्या खात्यात १५ दिवसात ₹३००० येणार? महत्त्वाचं कारण आले समोर

Stomach Worms Symptoms: मुलांच्या पोटात जंत झालेत? कसं ओळखाल? शरीरात दिसतात ही लक्षणे

SCROLL FOR NEXT