karde beach, drowned , youth, panchgani SaamTv
महाराष्ट्र

Karde Beach : कर्दे समुद्रात बुडालेल्या पाचगणीतील युवकाचा मृतदेह सापडला; पाच जणांचा वाचला जीव

अंधार पडल्यानंतर रविवारी शाेध माेहिम थांबविण्यात आली हाेती.

साम न्यूज नेटवर्क

- जितेश कोळी

Karde Beach : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील कर्दे समुद्रात (sea) बुडालेल्या युवकाचा मृतदेह तब्बल साेळा तासांनंतर शोध मोहिमेत सापडला आहे. स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी रविवारी सायंकाळपासून ही शोध माेहिम सुरू केली होती. अखेर सौरभ प्रकाश घावरे याचा मृतदेह हाती लागला आहे. साैरभ हा सातारा (satara) जिल्ह्यातील आहे. (Breaking Marathi News)

कर्दे समुद्रात रविवारी वाई तालुक्यातील सहा जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. यावेळी स्थानिकांना सहापैकी पाच जणांना वाचवण्यात यश आलं. या घटनेत एक युवक सुमद्रात बुडाला. त्याचा शाेध सर्वांनी घेतला परंतु अंधार पडल्यानंतर शाेध माेहिम थांबविण्यात आली.

कार्तिक घाडगे, यश घाडगे, दिनेश चव्हाण, अक्षय शेलार, कुणाल घाडगे या पाच जणांना स्थानिकांना वाचवण्यात यश आलं हाेते. परंतु सौरभ घावरे याचा शाेध लागू शकला नाही. या घटनेने सर्व मित्रांना माेठा धक्का बसला हाेता. आज (साेमवार) पुन्हा शाेधमाेहिमेस प्रारंभ झाला.

अखेर सौरभ प्रकाश घावरे याचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर आढळून आला आहे. सातारा जिल्ह्यातील पाचगणी येथील सौरभ हा आपल्या मित्रांसोबत कर्दे येथे पर्यटनासाठी आला होता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri chinchwad : शेअर मार्केटच्या नावाखाली ६४ लाखात फसवणूक; टोळी पोलिसांच्या ताब्यात

Jalna : जालन्यातील शेतकऱ्याने शेतातील भाजी काढण्यासाठी वापरला रोपवे | VIDEO

Natural Hair Growth: केस सतत गळतायेत, वाढ होत नाहीये? मग सकाळीच करा हे एक काम

Maharashtra Live News Update: शेतकऱ्यांना सर्वसमावेशक मदत देण्याचा प्रयत्न असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लिव्हर ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन करण्यासाठी किती तास लागतात?

SCROLL FOR NEXT