उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि संरक्षक मुलायमसिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे निधन झाले आहे. आज १० ऑक्टोबरला सकाळी ८.१६ वाजता वयाच्या ८२ व्या वर्षीअखेरचा त्यांनी श्वास (Died) घेतला. गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Mulayam Singh Yadav Passed Away)
मुलायम सिंह यादव यांना श्वास घेण्यास त्रास आणि रक्तदाब कमी झाल्याच्या तक्रारीनंतर 22 ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. 1 ऑक्टोबरच्या रात्री त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते, जिथे डॉक्टरांचे एक पथक त्यांच्यावर उपचार करत होते.
मुलायम सिंह यादव यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1939 रोजी झाला. पाच भावांमध्ये मुलायम सिंह हे तिसरे अपत्य होते. मुलायम सिंह यांनी आपल्या करिअरची सुरुवात कुस्तीपासून केली होती. ते व्यवसायाने शिक्षक होते. काही काळ इंटर कॉलेजमध्ये अध्यापन केले. त्यांच्या वडिलांना त्यांना पैलवान बनवायचे होते. त्यानंतर त्यांचे राजकीय गुरु नाथू मुलायम सिंह यांच्यावर प्रभाव टाकला आणि मुलायमसिंह यादव जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात पाऊल ठेवले. 1982-1985 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते.
1967 मध्ये मुलायम सिंह पहिल्यांदा आमदार झाले. यानंतर 5 डिसेंबर 1989 रोजी ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. मुलायम यांनी जसवंतनगर विधानसभा मतदारसंघातून आपल्या राजकीय प्रचाराला सुरुवात केली. त्यांनी समाजवादी पक्ष, प्रजा सोशालिस्ट पार्टी पुढे नेली. 1967, 1974, 1977, 1985, 1989 मध्ये ते विधानसभेचे सदस्य होते. मुलायम सिंह 1989, 1993 आणि 2003 मध्ये यूपीचे मुख्यमंत्री होते. ते लोकसभेचे सदस्यही होते.
1996 च्या निवडणुका जिंकून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. त्यानंतर 1998 मध्येही त्यांनी विजय मिळवला. 1999 च्या निवडणुकीतही त्यांची विजयी घोडदौड सुरू होती. 2004 मध्ये त्यांनी मैनपुरीमधून लोकसभा निवडणूक जिंकली. 2014 मध्ये त्यांनी आझमगढ आणि मैनपुरी येथून निवडणूक लढवली आणि दोन्ही जागांवर विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीतही या दिग्गज सपा नेत्याची विजयी घौडदौड कायम राहिली आणि मैनपुरीतून विजय मिळवून पुन्हा एकदा संसदेत पोहोचले.
यापूर्वी मुलायम सिंह यादव यांच्या पत्नी साधना गुप्ता यांचे या वर्षी जुलैमध्ये निधन झाले होते. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे गुरुग्राम येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. साधना या मुलायम सिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. त्यांची पहिली पत्नी मालती देवी यांचे 2003 मध्ये निधन झाले. मालती देवी या अखिलेश यादव यांच्या आई होत्या.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.