Parbhani Violence Saam Tv News
महाराष्ट्र

Somnath Suryavanshi: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मोठी अपडेट, फौजदारांसह ४ पोलिस निलंबित

Parbhani Police: सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात याआधीच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आले होते. आता या प्रकरणात आणखी ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. आतापर्यंत एकूण ५ पोलिस निलंबित झाले आहेत.

Priya More

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत असताना झाला होता. कोठडीतील मृत्यूप्रकरणी जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी आणि ३ पोलिस असे एकूण ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात याआधीच पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित करण्यात आले होते. आता याप्रकरणामध्ये आणखी ४ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे. परभणी शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या फौजदार कार्तिकेश्वर तुरनर, पोलिस अंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण आणि राजेश जटाळ या चार पोलिसांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आंबेडकरी अनुयायांनी परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता. हा लाँग मार्च नाशिकपर्यंत पोहचला होता. पण परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि सुरेश धस यांनी मध्यस्थी केली आणि लाँग मार्च काढणाऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर हा लाँग मार्च स्थगित करण्यात आला. २३ व्या दिवशी आंदोलकांनी लाँग मार्च स्थगित केला. आंदोलकांच्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर लाँग मार्च स्थगित करण्यात आला. १ महिन्यात सर्व मागण्या पूर्ण न झाल्यास नाशिकपासून पुन्हा लाँग मार्च काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला.

परभणीतील हिंसाचार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलिस कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. सोमनाथ सूर्यवंशीला पोलिस कोठडीत पोलिसांनी केलेल्या माराहामीमुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या आईने आणि विरोधकांकडून केला जात आहे. सोमनाथला न्याय मिळावा यासाठी आंदोलनं आणि मोर्चे काढले जात आहेत. सरकारकडून देण्यात आलेली मदत देखील त्याच्या आईने घेतली नाही. माझ्या मुलाला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आम्हाला न्याय नाही मिळाला तर मी आत्महत्या करेन, असा इशारा देखील सोमनाथच्या आईने सरकारला दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

Shocking : आत्याच्या घरी सुरु होती लगीन घाई, कुटुंबीयांची नजर चुकवून १३ वर्षीय मुलीने केली आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

Male Fertility Decline: तुमच्या जेवणामध्ये असलेल्या 'या' एका घटकाने पुरुषांचा कमी होतो स्पर्म काउंट

Maharashtra Live News Update: खेड पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेना पक्षाच्या इच्छुक उमेदवाराच्या घरासमोर जादूटोणा

SCROLL FOR NEXT