Chhagan Bhujbal On Shivaji Maharaj Statue Collapse Saam tv
महाराष्ट्र

Shivaji Maharaj Statue : मालवणमध्ये शिवपुतळा उभारताना गफलत झाली, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य

Chhagan Bhujbal On Shivaji Maharaj Statue Collapse : पुतळा पडणं ही दुर्दैवी घटना आहे. फक्त मराठी माणसाचं नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना दुःख झालं आहे. याला कोण जवाबदार आहेत, याबाबत चौकशी होईल: छगन भुजबळ

Satish Kengar

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. यावरच आता मंत्री छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले आहेत की, ''पुतळा पडणं ही दुर्दैवी घटना आहे. फक्त मराठी माणसाचं नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या सगळ्यांना दुःख झालं आहे. याला कोण जवाबदार आहेत, याबाबत चौकशी होईल. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यांचे नाव समोर येईल.'' मालवणमध्ये शिवपुतळा उभारताना गफलत झाली, असल्याचंही भुजबळ म्हणाले आहेत. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, ''असे पुतळे उभारताना सरकारचे कडक नियम आहेत. पुतळा कसा दिसला पाहिजे, कसा असला पाहिजे, कसे बसवायला पाहिजेत याबाबत नियम आहेत. असे कडक नियम असताना देखील ही घटना कशी घडली. पुतळा बनवण्यामध्ये काही चूक झाली आहे का? याबाबत मला माहित नाही, पण चर्चा ऐकतोय.

ते म्हणाले, ''सरदार वल्लभभाई पटेल यांचे देखील मोठा पुतळा बसवण्यात आला आहे. तिथे पण मोठा पुतळा आहे. सर्व गोष्टींचा विचार करून पुतळे बसवले जातात, कुठेतरी चूक झाली आहे.''

दरम्यान, राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याची उभारणी निकृष्ठ पद्धतीने केल्यामुळे पुतळा कोसळला, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पिंपरी वाघेरे येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनस्थ पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. तसेच केंद्र आणि राज्य सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT