solapur shocking  Saam tv
महाराष्ट्र

६ वर्षांपासून प्रेम, गर्लफ्रेंडने लग्नाला नकार दिला; तरुणाने लॉजमध्ये जाऊन आयुष्य संपवलं

solapur shocking : सोलापुरात गर्लफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने लॉजमध्ये जाऊन आयुष्य संपवलं आहे. तरुणाच्या आत्महत्येने शहरात खळबळ उडाली आहे.

भारत नागणे

राज्यात आत्महत्यांचं सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रेमामुळे आलेले नैराश्य, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या होण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. सोलापूरातही अशीच धक्कादायक घटना घडली आहे. सोलापुरात तरुणाने लग्नाला नकार दिल्याने तरुणाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तरुणाच्या आत्महत्यने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नात्यातील तरुणीने लग्नास नकार दिल्याने तरुण नैराश्यात गेला होता. नैराश्यात गेलेल्या तरुणाने शहरातील एका लॉजमध्ये जाऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. हरीश भास्कर बंडी असे मृत तरुणाचे नाव आहे. नात्यातीलच मुलीसोबत मागील 6 वर्षांपासून मुलाचे प्रेमसंबंध होते.

लग्नाची मागणी घालण्यासाठी मुलीच्या घरी दोन वेळा बोलणीही झाली होती. पण मुलीच्या आई-वडिलांनी पत्रिका न जुळल्याचे कारण सांगून लग्नास नकार दिला होता. यामुळे मुलगा हरीश बंडी हा मानसिक नैराश्येत गेला. त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण अखेर मुलाने आत्महत्या केल्याचे पालकांनी सांगितलं.

तरुणाने लॉजमध्ये आत्महत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. त्यानंतर सोलापूर पोलिसांनी हरीशचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. हरीशच्या आत्महत्येचे प्राथमिक कारण समोर आले असून पुढील सर्व बाबींचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.

पोलिसांना लॉजमध्ये कोणत्याही प्रकारची चिठ्ठी सापडलेली नाही. आता मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स, मेसेज आणि चॅट्सची तपासणी केली जात आहे. या तापासानंतर हरिशच्या मानसिक तणावाचा महत्वाचा पुरावा हाती लागणार आहे. हरिशच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूने त्याचे नातेवाईक आणि मित्रपरिवार हादरून गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

22 वर्षीय महिलेचा प्रसूतीदरम्यान मृत्यू; कुटुंबीय, नातेवाईकांचा गोंधळ, मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला

Mumbai To Shirdi : साईनगरी शिर्डीला जाताय? मुंबईहून कमी खर्चात 'या' सोप्या मार्गाने करा प्रवास

Maharashtra News Live Update : कल्याण बुद्धभूमी फाऊंडेशन प्रकरण; बुद्धभूमीकडून १५ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनाची घोषणा

खुशखबर! लाडक्या बहि‍णींना १५०० रुपये कधी मिळणार? महत्त्वाची अपडेट समोर

Mumbai Women's T20 League: सोबो मुंबई फाल्कन्सच्या महिलांनी रचला इतिहास, पहिल्याच मुंबई लीगमध्ये शानदार विजेतेपदाचा मान

SCROLL FOR NEXT