student appeared for exam (file photo) Saam Tv
महाराष्ट्र

४ दिवसांत विद्यापीठाने निर्णय बदलला; ऑफलाईन नव्हे ऑनलाईन परीक्षा

परीक्षा मंडळाचा हा निर्णय अंतिम वर्षाच्या परीक्षांना ही लागू असणार आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विद्यार्थ्यांची सुरक्षितता म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने (solapur university) ऑफलाईन पद्धतीची एेवजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा (exam) घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या नव्या निर्णयाची नाेंद विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी असे आवाहन सोलापूर विद्यापीठाने केले आहे.

राज्य शासनासह सोलापूरच्या जिल्हा प्रशासन आणि महापालिका आयुक्तांनी कोविड १९ विषाणूचा नवा omicron या प्रादुर्भाव हाेऊ नये यासाठी नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांचे लसीकरण किंवा ७२ तासांसाठीचा असलेला आरटी पीसीआरचे (rt-pcr) प्रमाणपत्र हवे. याबराेबरच सार्वजनिक ठिकाणी येण्यासाठी लसीकरण बंधनकारक केले आहे. या नियमांमुळे विद्यापीठ स्तरावरील परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेणे कठीण ठरू शकते. त्यामुळे विद्यापीठाने नवा निर्णय नुकताच जाहीर केला.

येत्या जानेवारीत घेतल्या जाणा-या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने हाेतील. त्याबाबतचे नवे परिपत्रक नुकतेच विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांना पाठविले आहे. दरम्यान नव्या बदलांची नाेंद विद्यार्थी आणि पालकांनी घ्यावी असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT